घरमहाराष्ट्रनाशिकड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक; राऊतांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मोर्चा

ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक; राऊतांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मोर्चा

Subscribe

ड्रग्ज प्रकणामुळे देशात चर्चेत असलेल्या नाशिकला ड्रग्जमाफियांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच वाढती बरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

नाशिक: ड्रग्ज प्रकणामुळे देशात चर्चेत असलेल्या नाशिकला ड्रग्जमाफियांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच वाढती बरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Thackeray group aggressive over drugs case Nashik A march in Nashik led by Thackeray group leader Sanjay Raut)

नाशिकमधील शिंदे गावात सापडलेले अंमली पदार्थ प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू होता. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकसह राज्यभरात हे ड्रग्ज पोहोचवले जात होते. यातील मुख्य संशयित ललित पाटील हाच यामागील सूत्रधार असल्याचंदेखील उघडकीस येत आहे. तो एका गुन्ह्यांखाली तुरूंगात होता. मात्र, आजारपणाचे कारण सांगून मागील काही महिन्यापासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. पण तिथूनच तो ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्यानंतर त्याने ससून रुग्णालयातून पळ काढलसा आणि नाशिकला मुक्कामही केला. त्यामुळे हे सर्व सुरू असताना नाशिकमधील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे सांगता येईल आणि याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला आहे.

- Advertisement -

राऊतांनी दिला होता इशारा

संजय राऊत काही दिवसांपूर्वी नाशिकला आले होते. त्यावेळी त्यांनी पोलीस, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचा सहभाग असल्याशिवाय हे राजरोसपणे चालू राहू शकत नाही, असा आरोप केला होता. त्यामुळे ठाकरे गट यावर आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. अखेर हा मोर्चा निघणार आहे. शालिमार येथील ठाकरे गटाच्या कार्यालयापासून निघणार असून मध्यवर्ती भागातून हा मोर्चा रविवार कारंजा, रेड क्रॉ, सिग्नल, मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल, असं सांगण्यात आलं आहे. नाशिक शहरात ड्रग्ज रॅकेट विरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखली 11 वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी नाशिक काँग्रेसनेदेखील रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं.

(हेही वाचा: ललित पाटीलच्या शिवसेना प्रवेशावेळी राऊत संपर्क प्रमुख होते; नीलम गोर्‍हे यांचा गौप्यस्फोट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -