घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक ड्रग्ज प्रकरणावरून संजय राऊतांचा नीलम गोऱ्हेंवर निशाणा, म्हणाले...

नाशिक ड्रग्ज प्रकरणावरून संजय राऊतांचा नीलम गोऱ्हेंवर निशाणा, म्हणाले…

Subscribe

ड्रग्ज विरोधात ठाकरे गटाकडून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये नाशिकमधील महाविद्यालयीन तरुण, तरुणी, शाळकरी विद्यार्थी, पालक, सामाजित संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आले होते.

नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यामुळे नाशिक शहराला अंमली पदार्थांचा विळखा बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील ड्रग्ज रॅकेट, अंमली पदार्थाचे सेवन वाढती गुन्हेगारी, रोलेट, बिंगोचे, जुगाराचे अड्डे , पोलिसांची निष्क्रियता या विरोधात ठाकरे गटाकडून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये नाशिकमधील महाविद्यालयीन तरुण, तरुणी, शाळकरी विद्यार्थी, पालक, सामाजित संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. (Sanjay Raut targets Neelam Gorha over Nashik drugs case)

हेही वाचा – निवडणुकीपूर्वी ‘302’च्या अनेक गुन्हेगारांना मुक्त करून…, ठाकरे गटाचा सरकारवर गंभीर आरोप

- Advertisement -

परंतु, या मोर्चात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्रक नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढले असून ते जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना देण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन असा अजब फतवा काढण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात आले आहेत. यामुळे संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. गोऱ्हे यांना नेमका काय अधिकार आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्या या मोर्चाला अनेक शैक्षणिक संस्थांना पाठिंबा दिला. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नशा मुक्तीचे बॅनर घेऊन तुमच्या मोर्चामध्ये सहभागी होऊ असे सांगितले होते. पण तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी न होण्याचे पत्रक काढले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी नशेच्या आहारी जावे का? शाळांच्या गल्लीतील पानटपरीवर ड्रग्ज मिळते, त्याला यांचा पाठिंबा आहे का? हे असे शैक्षणिक अधिकारी असतात का? विद्यार्थ्यांना एक दिशा देण्याचे काम करत होतो. पण सरकारने याबाबतचे पत्र काढले.

- Advertisement -

परंतु, हा निर्णय घेण्यासाठी कलेक्टरकडे बैठका घेण्यात आल्या. त्या बैठकांसाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आल्या होत्या. ज्या आधी आमच्याकडे नंतर तिथे पळाल्या. त्यांची बैठक झाली तर का विद्यार्थ्यांना या मोर्चात सहभागी करून घेऊ नका यासाठी. पण यांचा याच्याशी संबंध काय? आपण एक महिला आहात. अनेक माता-भगिनींची मुले, भाऊ या विळख्यात सापडलेले आहेत. पण आपण इतक्या क्रूरपणे कलेक्टरकडे जाऊन आदेश द्यायला सांगता, असा आरोप संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केला आहे.

पण तुमचा राजकारणाशी संबंध काय? आपण एका अशा खुर्चीवर बसलेल्या आहात, ज्याला राजकारणाचे वारे लागू नये, असे आम्ही म्हणतो. ते तुमचे काम नाही. पण त्या बाईंनी नाशिकमध्ये येऊन, कलेक्टरसोबत बैठक घेऊन या मोर्चाच्या संदर्भात शाळा, कॉलेजच्या मुलांनी सहभागी होऊ नये, असे आदेश देण्यास सांगितले. पण त्या कोणत्या अधिकारांनी असे आदेश देत आहात. तुम्ही या जिल्ह्याच्या राजकारणातील आहात का? असा प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले की, या बाईंनी इतर सर्व नियम माहीत आहे, पण त्यांना पक्षांतराचा नियम नाही माहीत. त्या या ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आहेत का? त्या कशा काय कलेक्टरसोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ शकतात, त्या राजकीय विधाने कशी काय करू शकतात? असे म्हणत संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांना सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -