घरमहाराष्ट्र.... म्हणून पर्यायी जागा सुचवली; रिफायनरी प्रकरणी संजय राऊतांकडून खुलासा

…. म्हणून पर्यायी जागा सुचवली; रिफायनरी प्रकरणी संजय राऊतांकडून खुलासा

Subscribe

बारसू जागा सुचवण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रिफायनरीबाबत केंद्राकडून, दिल्लीतून सातत्याने पर्यायी जागा सुचवण्याची मागणी केली जात होती. हा दिल्लीचा आग्रह असल्याने पर्यायी जागा ठाकरेंनी सुचवल्याचं राऊत म्हणाले. 

मागच्या काही दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पावरुन राज्यातील राजकारण पेटल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचा या प्रकल्पाला विरोध आहे. अशातच बारसूची जागा उद्धव ठाकरे यांनीच सुचवल्याचं पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यामांना दाखवत ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली. त्यानंतर आता ठाकरेंनी पर्यायी जागा का सुचवली याबाबत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. (  Thackeray Group leader Sanjay Raut cleared the reason behind on Rifinary Project in Barasu )

बारसूच्या संदर्भात स्थानिक लोकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घ्या, असं  शरद पवार म्हणाले. परंतु लोकांचा विश्वासच नाही. राऊत म्हणाले की, बारसू जागा सुचवण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रिफायनरीबाबत केंद्राकडून, दिल्लीतून सातत्याने पर्यायी जागा सुचवण्याची मागणी केली जात होती. हा दिल्लीचा आग्रह असल्याने पर्यायी जागा ठाकरेंनी सुचवल्याचं राऊत म्हणाले.

- Advertisement -

रत्नागिरी, बारसू येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या विरोधामुळे काल, 27 एप्रिलला विरोधक आणि प्रशासनाची बैठकही झाली. त्यावर काहीही तोडगा निघाला नाही. आज, शुक्रवारी मोर्चा काढला जाणार आहे.

( हेही वाचा: उद्धव ठाकरे बारसूला भेट देणार; खासदार विनायक राऊत यांची माहिती )

- Advertisement -

राऊत म्हणाले की, आम्ही बारसू जागा सुचवली होती. परंतु कधीही जबरदस्ती केली नाही, स्थानिकांचा विरोध असेल तर बारसूही नको अशीच आमची भूमिका आहे. कोकणातील लोकांचा विरोध पाहता, सरकारने भूसंपादन आणि सर्व्हेक्षण मागे घ्यावे, असं आवाहन करत असल्याचं राऊत म्हणाले. तसचं, बारसूच्या आसपास ज्या  नेत्यांनी आणि परप्रांतियांनी जागा खरेदी केल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या हट्टासाठी बारसू प्रकल्प चालवला जात असल्याचा आरोपही राऊतांनी केला. त्या सर्व अधिकाऱ्यांची माहिती सरकारने जाहीर करावी, नाहीतर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत ती यादी लवकरच जाहीर करतील, असे राऊतांनी स्पष्ट केलं.

करु द्या टीका

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. त्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. करु द्या टीका. ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. टीका करण्याचा अधिकार आहे. पण स्ततार यांच्या टीकेने काही फरक पडणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -