घरमहाराष्ट्रSanjay Raut On BJP : ईव्हीएम आणि ईडीमुळेच भाजपाचे अस्तित्व, संजय...

Sanjay Raut On BJP : ईव्हीएम आणि ईडीमुळेच भाजपाचे अस्तित्व, संजय राऊत कडाडले

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (2 फेब्रुवारी) माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपावर कडाडून टीका केली. यावेळी संजय राऊत म्हणाले की, भाजपाचा डाव सरळ आहे. जे लोक भाजपासोबत जात नाहीत, त्यांच्यावरच ईडीचे छापे त्यांच्यावरच टाकले जातात. मात्र जे भाजपासोबत जातात, त्यांना काहीच होत नाही, ते मोकळे राहतात, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे ट्वीट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. या संदर्भात संजय राऊत यांना प्रश्न करण्यात आला, त्यावर संजय राऊत म्हणाले की, भ्रष्टाचारी हेच भाजपाचा चेहरा आहे आणि जो भ्रष्टाचारी भाजपसोबत जाईल तो पवित्र होईल. ईडी, आयटीला विचारा. भाजपानेच त्यांच्यावर आरोप केले होते, त्यांना तुरुंगातही टाकले होते. आता त्यांची फाईल सापडत नाही. छगन भुजबळ कोणत्या पक्षात जातील माहिती नाही, पण अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी यांच्याप्रमाणे भुजबळही भाजपचा चेहरा नक्कीच बनू शकतात. कारण भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा आहे, जो भ्रष्टाचारी भाजपसोबत जाईल तो पवित्र होईल, अशी टीका संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा… Bhujbal On Damania : भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले; “मला कोणतीही ऑफर नाही”

संजय राऊत पुढे म्हणाले की, हेमंत सोरेन यांची अटक आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे. ईडीची कारवाई 99 टक्के बेकायदेशीर आहे. परंतु ईडी ही भाजपची विस्तारित शाखा असून भाजप सांगेल तेच करते. ED आणि EVM शिवाय भाजपचे अस्तित्व नाही. ईडी आणि ईव्हीएम है, तो मोदी है असा नारा देशभरात घुमतोय. जे भाजपसोबत नाहीत त्यांच्यावर ईडी कारवाई करते, असा आरोपही राऊत यांनी केला.

- Advertisement -

वंचितचा मविआमध्ये समावेश

संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीवरही भाष्य केलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत अधिकृतपणे समावेश केलेला आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत. प्रकाश आंबेडकर स्वत: चर्चेत सहभागी होत आहे आणि महाराष्ट्रातून भाजपची हुकुमशाही हद्दपार करण्यासाठी शर्थ करताहेत, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा… Thackeray On BJP :…ये बता कि काफिला क्यूँ लुटा? ठाकरेंचा शायराना अंदाजात भाजपला सवाल

हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्यापही नव्या सरकारचा शपथविधी पार पडलेला नाही. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, आपल्याकडे लोक झोपेत असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेतात. अजित पवार दुपारी देवगिरीतून निघतात आणि पाच मिनिटांत शपथविधी होतो. पण झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाकडे पूर्ण बहुत आहे. परंतु सरकार आणि मुख्यमंत्री वेटिंगवर आहेत. ही लोकशाही आहे देशात, असं संजय राऊत म्हणाले.

अंजली दमानिया यांच ट्वीट चर्चेत

समाजसेविका अंजली दमानिया यांनी आपल्या X (ट्विटर) या सोशल मीडिया साइटवर एक पोस्ट करत त्यामध्ये लिहिलं आहे की, भुजबळ भाजप च्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप. अंजली दमानिय यांनी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -