घरमहाराष्ट्रठाणे : रेतीबंदर परिसरातील ८ झोपड्यांचा होणार कायापालट

ठाणे : रेतीबंदर परिसरातील ८ झोपड्यांचा होणार कायापालट

Subscribe

पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोपडपट्ट्यांचा कायापालट होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कंबर कसली असून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांनी आज सकाळी या परिसराची पाहणी केली.

पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोपडपट्ट्यांचा कायापालट होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कंबर कसली असून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांनी आज सकाळी या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मिसाल मुंबई या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील आठही झोपडपट्टयांची आकर्षक रंगरंगोटी करण्याबरोबरच या ठिकाणी मुलभूत कामे करण्याचे आदेश जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महत्वाचे म्हणजे या परिसरात स्मशानभूमीचा गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबरपासून या कामांना सुरूवात होणार आहे.

हेही वाचा – नर्गिस दत्त नगरमध्ये दहा वर्षात ४९ हजार वेळा लागली आग

- Advertisement -

‘या’ कामांच्या सूचना देण्यात आल्या

जयस्वाल यांनी आज आमदार आव्हाड यांच्यासह या परिसराची पाहणी करून कोणत्या गोष्टी प्राधान्याने करावयाच्या आहेत याचा आढावा घेतला. यामध्ये जुना गवळी पाडा येथे मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, शौचालयाचे कनेक्शन, विद्युत पोल बसविणे, कल्व्हर्ट बांधणे, नालेची भिंत बांधणे, मोबाईल हेल्थ सेंटर उपलब्ध करून देणे आदी सुविधा देण्याबाबत कार्यकारी अभियंत्यास आदेशित केले. त्याचप्रमाणे राणा नगर-जुना गवळी पाडा येथील दत्त मंदीरासमोर ओपन जिम तयार करणे, शाळा क्र. ४९९३ वर पत्रे बसविणे, या परिसरात पुरेसा पाणी पुरवठा करणे, विद्युत पोल बसविणे आदी कामे करण्याच्या सूचनाही दिल्या. त्याचप्रमाणे परिसरात कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्या बसविणे, महिला बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी जावून कचरा गोळा करणे, नाल्याचे बांधकाम करणे या कामांबरोबरच शिवाजी नगर भागात नाल्यांची साफसफाई, दुरूस्ती, शौचालयास पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा करणे, स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून शौचालयाची साफसफाई करणे त्याचप्रमाणे पंजाबी कॉलनी, आदर्श वसाहत, गौतम नगर, राम वाडी या परिसरात नालेसफाई, नाले खोल करणे व गटारे साफ करणे आदी कामे करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

झोपडपट्यांना रंगरंगोटी करणार

रेतीबंदर नुतन मैदान ४ नंबर या ठिकाणी स्मशानभूमीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच येथील कल्व्हर्टची नियमित साफसफाई करण्याच्या सूचना त्यांनी घन कचरा विभागास दिल्या. त्याचप्रमाणे आजपासून या परिसरातील साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान या परिसरात असलेल्या आठही झोजडपट्टांची मिसाल मुंबई या स्वंयसेवी संस्थेच्या अध्यक्षा रूबल नागी आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून आकर्षक रंगरंगोटी करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांनी इंदिरानगर, डोंगरीपाडा या ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे रूपडे बदलून टाकले होते. आता रेतिबंदर परिसरातील आठही झोपड्यांचे रंगरूप बदलण्यासाठी त्या सरसावल्या आहेत.

- Advertisement -

४० वर्षांत पहिल्यांदाच आयुक्त आले – आ. आव्हाड

गेल्या ४० वर्षांपासून या ठिकाणी लोकांची वस्ती आहे. पण एकाही अधिकाऱ्याने या झोपडपट्टीला कधी भेट दिली नाही. पण संजीव जयस्वाल हे पहिले आयुक्त आहेत की त्यांनी या झोपडपट्टीला भेट देवून तेथील मुलभूत कामे करण्यास प्राधान्य दिल्याचे सांगितले. जयस्वाल जे बोलतात ते करतात या तत्वाने वागतात अशे सांगून आव्हाड यांनी या झोपडपट्टी परिसराचा कारयापालट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला याबद्दल त्यांनी सर्वांच्या वतीने त्यांचे जाहिर आभार मानले.


हेही वाचा – ठाणे, कल्याणात विसर्जनासाठी वाहतुकीत बदल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -