घरदेश-विदेशजैश-ए-मोहम्मदशी जोडलेल्या १० जणांना पोलिसांनी केली अटक

जैश-ए-मोहम्मदशी जोडलेल्या १० जणांना पोलिसांनी केली अटक

Subscribe

सुरक्षा एजन्सीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरुन या १० लोकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून पोलिसांनी आयईडी आणि ग्रेनेड तयार करण्याचे साहित्य, विस्फोटक आणि काही संशयित दस्ताऐवज जप्त केले आहेत.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोमवारी दक्षिण काश्मीरच्या दोन वेगवेगळ्या भागामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी जोडलेल्या १० लोकांना अटक केली आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवाना जिल्ह्यातील त्राल आणि पंपोर येथे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले सर्व जण घाटीमध्ये मोठी दहशतवादी कारवाई करण्याच्या तयारीत होते. मात्र त्याआधीत जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा एजन्सीने सतर्कतेने या सर्वांना अटक केली आहे.

- Advertisement -

अशी केली कारवाई

जम्मू-काश्मीरच्या दक्षिण काश्मीरमध्ये जैश- ए- मोहम्मदशी जोडलेले काही लोकं सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या सूचनेच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक टीम बनवून तपास सुरु केला. तपासामध्ये पोलिसांनी त्राल आणि पंपोर भागामध्ये दोन दहशतवादी ठिकाणावर छापे मारले. पुलवामाच्या त्रालमध्ये केलेल्या छापेमारीमध्ये पोलिसांनी ४ संशयितांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या चार जणांची ओळख पटलेली आहे. फयाज अहमद वानी, रियाज अहमद गनी, बिलाल अहमद आणि युसूफ नबी अशी त्यांची नावे आहेत.

- Advertisement -

१० जणांना अटक

तर, दुसऱ्या ठिकाणी ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी पंपोर जिल्ह्यातून जैश-ए-मोहम्मदशी जोडलेल्या ६ लोकांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कारवाईमधअये अटक करण्यात आलेले लोकं त्रालमध्ये काही दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. याच दरम्यान सुरक्षा एजन्सीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरुन या १० लोकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून पोलिसांनी आयईडी आणि ग्रेनेड तयार करण्याचे साहित्य, विस्फोटक आणि काही संशयित दस्ताऐवज जप्त केले आहेत. त्यानंतर यासर्वांची अज्ञात ठिकाणी नेऊन चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -