घरमुंबईठाणे, कल्याणात विसर्जनासाठी वाहतुकीत बदल

ठाणे, कल्याणात विसर्जनासाठी वाहतुकीत बदल

Subscribe

ठाणे  : दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी अनंत चर्तुदर्शीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिका, पोलीस आणि वाहतूक विभाग सज्ज झाले आहेत. वाहतूक कोंंडी टाळण्यासाठी शहराच्या वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे. विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेकडूनही विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

गणेश विसर्जनानिमित्त पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षा रक्षक अग्निशमन दल एनसीसीचे कॅडेट्स आदी ५०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावाजवळ दोन उपवन येथील पालायदेवी मंदिराशेजारी एक आंबेघोसाळ तलाव निळकंठ वुड्स टिकुजीनीवाडी बाळकूम रेवाळे खारेगाव येथे पालिकेने कृत्रीम तलाव तयार केले आहेत. तसेच पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार करण्यात आले आहेत.

- Advertisement -

अशी असेल वाहतूक व्यवस्था

गणपती विसर्जन मार्गावरून मिरवणुका निघत असल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे. या मार्गावर पोलीस अग्निशमन दल आणि रूग्णवाहिकांना प्रवेश असणार आहे.

कळवा वाहतूक विभागाच्या हद्दीत विटावा घाट शिवाजी चौक गणेश घाट खारेगाव तलाव पारसिक रेतीबंदर गणेश घाट येथे गणेश मुर्तीचे विसर्जन होत असल्याने या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नवी मुंबई बेलापूर रोडने तसेच ऐरोली पटणी मार्गे विटावा जकात नाका -कळवा शिवाजी चौकातून ठाण्याच्या दिशेने येणार्‍या जड अवजड वाहनांनी व परिवहन बसेस एसटी खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसना विटावा जकात नाका येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्व शहरातील गणेश मुर्तीचे चोळेगाव येथील तलावात तसेच डोंबिवली पश्चिम येथील मोठागाव रेतीबंदर येथे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येते. कल्याण मानपाडा रोडने चोळेगाव विसर्जन तलावाचे दिशेने जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदीश हॉटेल येथील नाक्यावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

रेतीबंदर चौक- सम्राट चौक-दिनदयाळ चौक रेतीबंदर चौक ते सत्यवान चौक व रेतीबंदर चौक ते फुले चौक या दरम्यान दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.

कल्याण येथे – मुरबाड रोड , महात्मा फुले रोड महंमदअली चौक, शिवाजी चौक, शंकरराव चौक, घेला देवजी चौक, दुधनाका, पारनाका, टिळक चौक, अहिल्याबाई चौक, गणपती चौक, तेलवणे हॉस्पिटल क्रॉस, मोहिंदर काबुलसिंग क्रॉस, लाल चौकी, दुर्गा माता चौक ते दुर्गाडी गणेश घाट असा मिरवणुकीचा मुख्य मार्ग आहे.

ध्वनिप्रदूषणावर करडी नजर

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण करणार्‍या डॉल्बी / डिजे सिस्टीमवर असलेले निर्बंध उठविण्यास उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिल्यानंतर या प्रदूषणकारी यंत्रणेच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. साऊंड सिस्टीम स्पीकरवरील मर्यादा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारच ठेवाव्यात याची काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांनी गणेश मंडळांना दिले आहेत. उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या शांतता क्षेत्रात नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता मंडळांनी घ्यावी असेही पोलिसांनी सूचित केले आहे. जे मंडळ आदेशाचे भंग करील त्याच्यावर कारवाई करण्याची तंबीही पोलिसांनी गणेश मंडळांना दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -