घरताज्या घडामोडीमाहुलमधील ते मृत्यू प्रदूषणामुळे नाही; पालिकेच्या अहवालानुसार माहिती

माहुलमधील ते मृत्यू प्रदूषणामुळे नाही; पालिकेच्या अहवालानुसार माहिती

Subscribe

माहुल एव्हरस्माईल येथे २०१३ ते जानेवारी २०२० या कालावधीत एकूण ५१ व्यक्तींचे मृत्यू झाले होते. हे मृत्यू प्रदुषणामुळे झाले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेने मंगळवारी विधानसभेत सादर केली आहे.

माहुल एव्हरस्माईल येथे २०१३ ते जानेवारी २०२० या कालावधीत एकूण ५१ व्यक्तींचे मृत्यू झाले होते. हे मृत्यू प्रदुषणामुळे झाले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेने मंगळवारी विधानसभेत सादर केली आहे. माहुल वासियांच्या रखडलेल्या पुनर्वसनाविषयी आणि त्यांना हक्काची घरे मिळण्यासाठी आमदार अतुल भातखळकर, प्रकाश फातर्पेकर, यामिनी जाधव यांच्यासह अनेकांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यासंदर्भात दिलेल्या उत्तराच्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या २३ सप्टेंबर २०१९ च्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन माहुल येथे होणार

दरम्यान, माहुल परिसरामध्ये करण्यात आलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन माहुल येथे करण्यात येत असून त्यांना अनेक सुविधा देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. ज्यात प्रामुख्याने सदर संकुलात साफसफाईकरिता मुंबई स्वच्छ वस्ती प्रबोधन अभियानाअतंर्गत संस्थाची नेमणूक करण्यात आली आहे. तर सदर संकुलामध्ये वेळोवेळी धुम्रफवारणी आणि मुषक नियत्रंण कारवाई देखील करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रस्ते दुरस्तीसाठी हायब्रीड अन्युईटी कायमच; स्थगिती नसल्याचा राज्य सरकारचा खुलासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -