घरमहाराष्ट्रनर्मदा नदीत बोट उलटून ५ भाविकांचा मृत्यू

नर्मदा नदीत बोट उलटून ५ भाविकांचा मृत्यू

Subscribe

क्षमतेपेक्षा अधिक जण बोटीत बसलयामुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.

नंदुरबारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नर्मदा नदीमध्ये भाविकांची बोट उलटली आहे. या बोटीमधून ६६ जण प्रवास करत होते. संक्रांतीनिमित्त नर्मदा नदीच्या पात्रात पूजनासाठी भाविक आले होते. दरम्यान धाडगाव तालुक्यातल्या भुसा पाईंटजवळ बोट उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये तीन लहान मुलांसह ५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान ४२ जण जखमी झाले आहेत. यासर्वांवर धाडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामधील ३६ जणांची प्रकृती गंभीर आहे. क्षमतेपेक्षा अधिक जण बोटीत बसल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.

अशी घडली घटना

मंगळवार दुपारी १२ वाजता दरम्यान भूसा गावातील नदीच्या पात्रात भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली. नदीच्या काठावरील अन्य भाविकांच्या तत्परतेमुळे बोटीमधील भाविकांचे प्राण वाचले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदूर्गम असे हे ठिकाण आहे. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही पंचनामा, बचावकार्य करण्यात असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले. या बोटीमध्ये ६६ भाविक प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवल्यामुळे बोट उलटल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

प्रकरणाचा तपास सुरु

बोट अपघातामध्ये मृत आणि जखमी झालेले भाविक धडगाव तालुक्यातील तेलखेडी आणि अन्य गावातील होते. मृत्यू झालेल्यां भाविकांमध्ये ४ वर्षाची लक्ष्मी भरत पावरा, ४ वर्षाचा भूपेंद्र भरत पावरा, १२ वर्षाची गीता दिलदार पावरा, ५ वर्षाची तुलसी रतिलाल पावरा, ६० वर्षीय मानव कालू पावरा अशी नावं आहेत.

हेही वाचा – 

- Advertisement -

इंडोनेशियामध्ये बोट उलटली; ३४ प्रवाशांचा मृत्यू तर ३१ बेपत्ता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -