घरमुंबईBEST Strike Update : आजही कोर्टात तोडगा नाही!

BEST Strike Update : आजही कोर्टात तोडगा नाही!

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्याचा आज आठवा दिवस आहे. राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. परंतु, याप्रकरणी आज न्यायालयाने सुनावणी दिलेली नाही. त्यामुळे संप सुरुच राहणार आहे.

बेस्ट संपाबाबत आजही कोर्टात तोडगा निघालेला नाही. यासंपाबाबत उद्या सकाळी ११ वाजता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. या संपाबाबत तातडीने निर्णय घ्या, असे निर्देश न्यायालयाने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिले आहे. बेस्ट जनतेच्या पैशांवर चालते, मग जनता वेठीस का? असा सवालही उच्च न्यायालयाने बेस्ट कर्मचाऱ्यांना केला आहे. बेस्ट संपाचा आज आठवा दिवस आहे. या संपावर आजही न्यायालयात सुनावणी न झाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार आहे.

उच्चस्तरीय समितीने न्यायालायात केला अहवाल सादर

गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कामगारांच्या संपासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. यावर राज्य सरकारने आपली भूमिका मांडली असून, ‘बेस्ट कामगारांनी आधी संप मागे घ्यावा, त्यांच्या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल’, असे सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. ‘बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर सरकार कारवाई करेल’, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -