घरमुंबई'सोने चाचणी' बेतते आहे रहिवाशांच्या जीवावर!

‘सोने चाचणी’ बेतते आहे रहिवाशांच्या जीवावर!

Subscribe

उल्हासनगरच्या सोनारगल्ली परिसरात केली जाणारी अॅसिड चाचणी स्थानिकांच्या जीवावर बेतते आहे, त्यामुळे मनसेने त्याविरोधत आवाज उठवला आहे.

उल्हासनगर शहरात असलेल्या सोनारगल्ली परिसरात जवळपास ३०० सोनरांची दुकाने आहेत. हे दुकानदार सोन्याची चाचणी करण्यासाठी धोकादायक पद्धतीने अॅसिड वापरतात. यामुळे स्थानिक रहिवाशांना धोका निर्माण झाल्याचा आरोप मनसे संघटक दिनेश आहुजा यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. उल्हासनगर कॅम्प १ येथील सोनारगल्ली असून ती अतिशय गजबजलेल्या परिसरात आहे. येथे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ असते. या परिसरात सुमारे ३०० सोनारांची दुकाने असून प्रत्येक सोनार आपल्या दुकानात सोनं विताळण्यासाठी ऍसिडचा वापर करतो. प्रत्येकाजवळ साधारण ३५ लिटर अॅसिडचा ड्रम आपल्याकडे ठेवत असतो. चाचणीनंतर अॅसिडचे हे पाणी नाल्यात सोडले जाते. मात्र, कधी कधी ते रस्त्यावरदेखील येते.


वाचा: ‘मोदींना मत हेच आम्हाला गिफ्ट’, मोदी भक्ताची लग्नपत्रिका

त्यामुळे जर एखाद्या वेळेस आग अथवा अनुचित प्रकार घडला तर येथील अरुंद गल्लीतुन अग्निशमन दलाची गाडी सुद्धा जाऊ शकत नाही. त्यामुळे धोकादायक पद्धतीने होणारी ही अॅसिची हाताळणी बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. यासंदर्भात ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वलेचा यांना विचारले असता ते म्हणाले, की ”हा प्रकार धोकादायक आहे त्यामुळे हे काम नियोजित रित्या केले पाहिजे. काही सोनार भाड्याने घरे घेतात आणि त्यामध्ये सोने विताळण्याचे काम करतात. यासाठी व्यावसायिक गाळे बनवले पाहिजेत आणि सांडपाण्याची व्यवस्था देखील चांगल्या रीतीने झाली पाहिजे.” आता यादृष्टीने ठोस पावले कधी उचलण्यात येणार हे येणारी वेळच सांगेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -