घरमहाराष्ट्रजगबुडीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प

जगबुडीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी नदी पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे हा पूल बंद करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. जगबुडी नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरून होणारी वाहतुक शनिवार सकाळपासून रोखण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपासून खेड तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आला असून खेड बाजारपेठेला पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेला पुराचा धोका निर्माण झाला असून शहरातील व्यापार्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

मुंबई -गोवा महामार्ग आज सकाळपासून जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. येथील ब्रिटिशकालीन पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी घेत खेड पोलिसांनी या पुलावरील वाहतूक आज सकाळपासूनच रोखलेली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये या पुलावरील वाहतूक रोखण्याची ही तब्बल पाचवी वेळ आहे. येथील नवीन पूल जोडरस्ता खचल्यामुळे अद्याप वाहतुकीसाठी खुला केलेला नसल्याने वाहनधारकांचे अधिकच हाल होत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जगबुडी नदीने अडवला मुंबई-गोवा महामार्ग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -