घरताज्या घडामोडीमंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान; म्हणाले...

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान; म्हणाले…

Subscribe

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला 11 महिने उलटून गेले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केले आहे.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला 11 महिने उलटून गेले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केले आहे. ‘मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल’, असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले. (The Cabinet Will Be Expanded Soon Says Chief Minister Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ‘मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल’, असे सांगितले. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि या मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांना संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

मागच्या ११ महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विस्तार होईल, असं बोललं जात होतं. मात्र अद्यापही सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. दरम्यान, शिवसेना आणि भाजपाचे 7-7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. “राज्य सरकार ७५ हजार नोकऱ्या देणार आहे. त्या अनुषंगाने पावलं उचलली जात आहे. सरकार शब्द पाळणार आहे. याशिवाय कौशल्य विकासाच्या माध्यमातन दोन लाख लोकांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा विभाग अनेक कंपन्यांशी समन्वय साधत असून तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगार देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या माध्यमातून दोन लाख लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 10 नेत्यांची चौकशी, सध्याच्या शासनाकडून सत्तेचा गैरवापर’; पवारांचा सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -