घरमहाराष्ट्रपुणेजमीन प्रकरणाशी 'अर्थाअर्थी' सबंध नाही..., बोरवणकर यांचे आरोप अजित पवारांनी फेटाळले

जमीन प्रकरणाशी ‘अर्थाअर्थी’ सबंध नाही…, बोरवणकर यांचे आरोप अजित पवारांनी फेटाळले

Subscribe

मुंबई: माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांशी माझा अर्थाअर्थी दूरान्वय देखील संबंध नाही, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मीरा बोरवणकर यांचे ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात येरवाडा पोलीस स्टेशनच्या जमिनीच्या लिलावाचा तत्कालीन पालकमंत्री आग्रही असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

मीरा बोरवणकरांच्या आरोपासंदर्भात अजित पवार म्हणाले, “माझे काम भेल आणि मी भला. कोणी माझ्यावर कोंमट केला तर मी काय त्याला उत्तर देत बसत नाही. ज्याचे त्याला लखलाभ. आपले आपले काम भले, असे करून मी माझा पुढे जात असतो. परंतु, गेले ३-४ दिवस माझ्यावर मीडियामध्ये बातम्या आल्या. मी त्या बातमीला जास्त महत्व दिला नाही. कारण तुम्ही जर बारकारईने बघितले तर तसा अर्थोअर्थी दूरान्वय देखील संबंध नाही. मी ज्या सरकारमध्ये काम केले. त्यांनी मला पुण्याचे पालकमंत्री ठेवले. अपवाद म्हणजे मी सरकारमध्ये नव्हते. माझ्या कामाची पद्धत आहे की, माझ्यावर ज्या जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्या जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागावे. पालमंत्री या नात्याने ज्या काही आढावा बैठका घेईच्या असतो”

- Advertisement -

हेही वाचा – मीरा बोरवणकरांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – “पुस्तकातील नोंद म्हणजे…”

… अजित पवारांचा संबंध नाही

अजित पवार पुढे म्हणाले, “मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. कारण ही केस 2008ची आहे. या केसला 15 वर्ष झालेली आहेत. हा काही साधा काळ नाही. त्यामुळे त्यासंदर्भात पेपर आहेत. तुम्ही जर माहितीच्या आधिकारात माहिती मागितली तर ती काही झाकून राहणार नाही. त्यावेळसे त्या कमिटीचे अध्यक्ष असलेले दिलीप बंड त्यांनी देखील पत्रकार परिषद सांगतले की, यात अजित पवारांचा काही संबंध नाही. हे गृहविभागाने घेतलेले काम आहे आणि मी ती कमिटी नेमलेले नाही. मला तर माहितीच नाही, अशी काही कमिटी नेमलेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांची न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी

कोणाची चौकशी करता, जागा आहे तिथेच

या प्रकरणात चौकशीची मागणी केली जात आहे, यावर अजित पवार म्हणाले, “कोणाची चौकशी करता, जागा आहे तिथेच आहे. जागा कुठे गेलेली नाही. जागा गृहविभागाची आहे आणि तिथे वेगवेगळे अधिकारी जाऊन बघून आले आहेत. ते रेकोर्डला देखील आहे की, पहाणी केली म्हणून. या सीपी असताना यांचा विरोध आहे. पण आधीच्या सीपीचे समर्थन आहे. कारण त्यांनी तशा स्वाक्षरी केली आहे. यानंतर त्यातील काही सीपी केंद्रात गृह राज्य मंत्री देखील झाले.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -