घरक्राइमगणपती आगमनाची मिरवणूक जीवावर बेतली; बुलडाण्याच्या तरुणाचा ओडिशात शॉक लागून मृत्यू

गणपती आगमनाची मिरवणूक जीवावर बेतली; बुलडाण्याच्या तरुणाचा ओडिशात शॉक लागून मृत्यू

Subscribe

सोहम कटक येथे MPSC आयोगाचे शिक्षण घेत होता. 19 सप्टेंबर रोजी गणेश आगमनाच्या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता

मुंबई : श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीत हातातील झेंड्याचा लोखंडी रॉडचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओडिसा राज्यातील कटक येथे ही घटन घडली. मृत्यू झालेला तरुण बुलडाणा तालुक्यातील डोंगरशेवली येथील रहिवासी असून, सोहम भगवान सावळे (24) असे त्याचे नाव आहे.(The procession of Ganapatis arrival came to life Buldana youth dies of shock in Odisha)

सोहम कटक येथे MPSC आयोगाचे शिक्षण घेत होता. 19 सप्टेंबर रोजी गणेश आगमनाच्या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता. एका मोठ्या वाहनातून मिरवणूक सुरू असताना सोहम हातातील भगवा ध्वज फडकवत होता. त्याच वेळी वरून जाणाऱ्या विजेच्या तारांना त्याच्या हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श झाला आणि काही क्षणात तो खाली कोसळला. त्याला स्थानिक रुग्णालयामध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओ देखील कॅमेऱ्यात कैद झाला असून तो ऱ्हदय हेलावणारा आहे. या घटनेमुळे बुलडाण्यासह डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

आज करण्यात आले सोहमवर अंत्यसंस्कार

या घटनेची माहिती कळताच सावळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. कटक येथून त्याचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले. यादरम्यान आज संध्याकाळी उशिरा बुलढाण्यात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : महिला आरक्षण विधेयक ‘या’वरून लक्ष विचलीत करण्यासाठी; राहुल गांधींची भाजपवर टीका

- Advertisement -

घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायर

काही क्षणापूर्वीच डिजेच्या तालावर नाचणारा सोहम विजेचा झटका लागून जागीच ठार झाला. आनंदाच्या भरात बेभान होऊन नचणाऱ्या सोहमची एक चूक त्याच्या जीवावर बेतली. सोहमचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

हेही वाचा : कानून के हाथ लंबे होते हैं…; चिमुरडीचा खून करणाऱ्या नराधमास बिहारमधून उचलले

तरुणांनो याकडे लक्ष द्या

सणासुदीला आनंद व्यक्त करताना, नाचताना भान ठेवा. बेभान होऊन नाचताना आपण स्वत:च्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार घेऊन मिरवतोय का? याचा विचार जरूर करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -