घरक्राइमकानून के हाथ लंबे होते हैं...; चिमुरडीचा खून करणाऱ्या नराधमास बिहारमधून उचलले

कानून के हाथ लंबे होते हैं…; चिमुरडीचा खून करणाऱ्या नराधमास बिहारमधून उचलले

Subscribe

भिवंडी शहरात एका 6 वर्षीय चिमुरडीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या नराधमाला पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने पकडले.

ठाणे : मुंबई शहरासह उपनगरांमध्ये महिला असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. याच दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि नंतर खून करून फरार झाल्या आरोपीस पोलिसांनी बिहारमधून अटक केली. या कारवाईचा थरार एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे.(Kanun ke haath long hote hain The murderer who killed the girl was picked up from Bihar)

भिवंडी शहरात एका 6 वर्षीय चिमुरडीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या नराधमाला पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने पकडले. बिहारी पद्धतीने वेषांतर करून त्याला बिहारमधील नवाद गावातून बेड्या ठोकल्या आहेत. सलामतअली आलम अन्सारी (32) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

- Advertisement -

आई-वडील कामावर,भावासोबत होती चिमुकली घरी

13 सप्टेंबर रोजी चिमुकलीचे आई-वडील कामावर गेले होते. यावेळी ती तिच्या भावासोबत घरी होती. हीच संधी नराधमाने साधत तिला चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह बादलीत कोंबून घराला बाहेरून कुलुप लावून फरार झाला होता. दुसरीकडे चिमुरडी बेपत्ता असताना सायंकाळी आई वडील घरी आल्यानंतर मुलाने बहीण दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेत रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची नोंद केली.

हेही वाचा : महिला आरक्षण विधेयक ‘या’वरून लक्ष विचलीत करण्यासाठी; राहुल गांधींची भाजपवर टीका

- Advertisement -

शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस तपासाला गती

पोलिसांनी तात्काळ घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात रवाना केला. भिवंडी शहर पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारी वरून हत्येचा गुन्हा दाखल केला. मृतदेह शवविच्छेदन अहवालामध्ये अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर नराधमाच्या घरात पोलीस पथकाने भौतिक तपास करून त्याचे नाव निष्पन्न केले. आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके बिहार राज्यात रवाना केली होती.

हेही वाचा : Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह या भागात पावसाची शक्यता; मात्र मराठवाड्यावर अवकृपाच

शासकीय योजनेचे आमिष दाखविल्यानंतर आरोपी अटकेत

विशेष म्हणजे पोलीस पथक आपल्या मागावर गावात असल्याची कुणकुण नराधमाला लागल्याने त्याने मोबाईल बंद केला होता. त्यानंतर पोलीस पथकाने केंद्र आणि बिहार सरकारच्या योजना राबविण्याचा बहाणा करत तशी वेशभूषा आणि बिहारी भाषा बोलून गावातील नागरिकांना योजनेच्या लाभाविषयी माहिती देत असतानाच, नराधमही या योजनेचा लाभ घेण्यासाठी येताच वेषांतर केलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -