घरमहाराष्ट्रगळके वर्ग, जीर्ण इमारतीत शिक्षणाचे धडे

गळके वर्ग, जीर्ण इमारतीत शिक्षणाचे धडे

Subscribe

465 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न

आदिवासी विकास विभागाच्या शहापूर तालुक्यातील पिवळी आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. हे बांधकाम गेली पाच वर्ष रखडून पडले आहे. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे आश्रमशाळेचे बांधकाम रखडले असल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. नवीन शाळेचे बांधकाम वेळीच पूर्ण न झाल्याने येथील 465 आदिवासी विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यात जुन्या पडझड झालेल्या चाळीतील गळक्या वर्ग खोल्यात बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.

पिवळी आश्रमशाळेत 1 ली ते 12 वीपर्यंते वर्ग भरतात. येथील एकूण 300 विद्यार्थी, विद्यार्थिनी निवासी आहेत. तालुक्यातील शिरोळ, दहागाव, शेणवा, डोळखांब या चार शाळांच्या इमारतींबरोबरच पिवळीतील नवीन इमारतीचे कामही सुरू झाले. मात्र, केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अभियंता, कंत्राटदार, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांंच्या अनास्थेमुळे येथील आश्रमशाळा व वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे काम रखडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

- Advertisement -

काम अर्धवट तरीही दीड कोटींचे बिल अदा
अभियंता व कंत्राटदार यांनी अपूर्ण ठेवलेल्या या इमारतीचे दीड कोटींचे बिल कंत्राटदारास अदा केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व आदिवासी विकास विभागातून हाती आली आहे. इमारतीचे बांधकाम अपूर्ण ठेवून कंत्राटदाराचे बिल अदा करणार्‍या व विद्यार्थ्यांना इमारतीअभावी हाल सहन करायला लावणार्‍या संबंधित अधिकारी, अभियंत्यांची पिवळी आश्रमशाळा इमारतीच्या गैरव्यवहारप्रकरणी सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -