घरताज्या घडामोडी'त्या' कुटुंबासोबत विमानातून प्रवास करणारे प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल

‘त्या’ कुटुंबासोबत विमानातून प्रवास करणारे प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल

Subscribe

संशयित रुग्णांनंतर दुबईहून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत करोनासाठी जे देश घोषित केले होते त्यामध्ये दुबईचा समावेश नव्हता.

करोना बाधीत पुण्यातील कुटुंबासोबत विमानातून प्रवास करणाऱ्या मुंबईतील सहा प्रवाशांना मंगळवारी मुंबई महापालिकेने शोधून काढले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्या सहा प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून आज बुधवार्यंत वैद्यकीय चाचणी अहवाल येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेश काकणी यांनी दिली.

दरम्यान, पुण्यातील हे कुटुंब एका खासगी ट्रॅव्हल कंपनीसोबत दुबईला फिरायला गेले होते. त्यानंतर भारतात जेव्हा ते आले, त्यांनी पुण्यातील रुग्णालयात आपली वैद्यकीय तपासणी केली. या वैद्यकीय तपासणीत त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, ह्या कुटुंबाला मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या कॅब चालकाला देखील करोनाची लागण झाली. त्यालासुद्धा पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी कॅब चालक पुण्याचा असल्याचे सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात करोना!

करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच दक्षता घेतली जात आहे. भारतातही केंद्र सरकारन खबरदारी घेत लोकांमध्ये याविषयी जनजागृती केली जात आहे. विमानतळावरही तपासणी केली जात आहेत. दरम्यान, या संशयित रुग्णांनंतर दुबईहून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत करोनासाठी जे देश घोषित केले होते त्यामध्ये दुबईचा समावेश नव्हता.

या-या जिल्ह्यातील दुबईमधून परत आलेले नागरिक 

अहमदनगर -०४

- Advertisement -

बीड – ०३

नागपूर – ०३

रायगड – ०२

पुणे – ०८

यवतमाळ – १०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -