घरमहाराष्ट्रनेरळमधील रस्त्याची कामे बंद

नेरळमधील रस्त्याची कामे बंद

Subscribe

ग्रामपंचायतीचा ठेकेदाराला दणका

रायगड जिल्हा परिषद काम करीत असलेल्या तालुक्यातील नेरळ गावातील अनेक रस्त्यांची कामे ठेकेदाराने अर्धवट ठेवली आहेत. रस्त्याची कामे पूर्ण करताना ठेकेदाराने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीला लक्ष घालण्याची विनंती केली. त्यामुळे अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराला कामे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यावरून गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

या रस्त्यांच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातून जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग रस्त्यांची कामे करीत होता. निधीमधून मंजूर असलेली आठ कामे करीत असताना ठेकेदाराकडून स्थानिक नागरिकांना अनेक आश्वासने दिली गेली. ती रस्त्यावर काँक्रीटकरण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण केली नाहीत. आता त्या कामांमधील शेवटचे काम नेरळ पाडा भागात सुरू आहे. हे काम काही दिवसांत पूर्ण होणार होते. मात्र ते काम पूर्ण झाल्यावर संबंधित ठेकेदार आपली कामे संपल्याने गाशा गुंडाळून निघून जाणार याची खात्री पटल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार ठेकेदाराला अर्धवट कामाबद्दल जाब विचारण्यात आला. त्यावेळी ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये अर्धवट राहिलेल्या कामांबद्दल घबराट पसरली आहे. अर्धवट राहिलेल्या कामांमध्ये खांडा भागातील रस्त्याचे तब्बल 200 मीटरचे काम आहे.

- Advertisement -

त्यामुळे ग्रामपंचायतीने नेरळ पाडा भागात सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पाडले आहे. नेरळ ग्रामपंचायत आता त्या ठेकेदारावर कामे अर्धवट ठेवल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. त्याआधी ग्रामपंचायतने फलक लावून गावातील रस्त्यांची कामे करताना जिल्हा परिषदेने नेमलेल्या ठेकेदाराने कामे अर्धवट ठेवल्याने आणि शेवटचे काम संपवून ठेकेदार निघून जाण्याची शक्यता असल्याने काम बंद केली आहेत. जनतेच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ठेकेदाराला वठणीवर आणण्यासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

नेरळ गावातील सर्व कामे ही नियमानुसार होतील, पण ठेकेदाराने कोणाला शब्द दिला याच्याशी आमच्या खात्याचा काहीही संबंध नाही.
– ए. ए. केदार
उप अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग

- Advertisement -

रस्त्याची कामे जिल्हा परिषद करीत आहे, त्यात आमचा काही संबंध नाही. पण ठेकेदाराने नेरळमधील रस्ते करण्यासाठी अनेकांची घरे तोडली, अनेक बांधकामे तोडली, त्यावेळी संबंधित ठेकेदाराने ग्रामस्थांना आश्वासने दिली आहेत. त्यांच्याशी ग्रामपंचायतीचा संबंध नाही, पण नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पुढाकार घ्यावा लागला आहे.
-जान्हवी साळुंखे, सरपंच, नेरळ ग्रामपंचायत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -