घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात सरकारचं अस्तित्व दिसत नाही; फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

महाराष्ट्रात सरकारचं अस्तित्व दिसत नाही; फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

Subscribe

महाराष्ट्रात सरकारचं अस्तित्वच दिसत नाही. आज राज्यामध्ये सरकार कुठे आहे हे विचारण्याची वेळ आली आहे, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. तसंच, महाविकास आघाडी सरकार हे आतापर्यंतचं भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला संबोधित करताना ते बोलत होते.

“महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचं संकट उभं राहिलं आहे. महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगतशील, सर्वाधिक समृद्ध, सर्वात मोठं अर्थव्यवस्था असलेलं राज्य आहे. पण आज राज्यामध्ये सरकार कुठे आहे हे विचारण्याचे वेळ आली आहे. सरकारचं अस्तित्व दिसत नाही. मुख्यमंत्री आहेत पण कोणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतोय. पण आपल्या स्वत: च्या पलीकडे पाहायला तयार नाहीत,” अशी टीका फडणवीस यांनी केली.

- Advertisement -

“महाराष्ट्रातील जनता रोज होरपाळतेय. पण त्यांच्याकडे लक्ष देण्याकरीता, त्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याकरिता कोणी नाही आहे. कोणी राज्य म्हणून विचार करत नाही. कोणी जनतेचा विचार करत नाही. कोणी समस्यांचा विचार करत नाही. पाच वर्ष आपलं सरकार होतं. आपल्या सरकारमध्ये समृद्धी महामार्ग, मेट्रो, कर्जमुक्ती, जलयुक्त शिवार, शेतकऱ्यांना मदत, सर्वांना घरं कशी देता येतील, डिजीटल इंडियावर चर्चा व्हायची. आज कशावर चर्चा होत नाही. आज या सरकारमध्ये कशावर चर्चा होते तर, गांजा…नाही हर्बल तंबाखू, सीबीडी स्मोक, वसुली, स्थहगिती, बलात्कार, दंगली, खंडणी, यावर चर्चा होते,” असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

“या सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे, वाटमारी सुरू आहे. पण सामान्य लोकांकडे पाहायला कुणालाही वेळ नाही. सुधीरभाऊंनी चांगला राजकीय प्रस्ताव मांडला. या सरकारचे कपडे काढले. पण सुधीर भाऊ यांचे कितीही कपडे काढले तरी या निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाही. त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरवेच लागेल. आता कोरोना आहे म्हणून थांबवू शकत नाही. दोन वर्ष कोरोना आहे म्हणून ते आम्हाला रोखत होते. आमच्यावर गुन्हे दाखल करत होते,” असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

“आम्ही कुणाला घाबरत नाही. आमच्याकडे इनामी पण नाही आणि बेनामी पण नाही. त्यामुळे आम्हाला घाबरण्याची गरज नाही. भ्रष्टाचाराविरोधात थेट लढाई लढणार. अधिकारीच सांगतात यांनी बाजार मांडलाय,” अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -