घरमहाराष्ट्रउदयनराजेंच्या उमेदवारीला कोणचाही आक्षेप नाही - शरद पवार

उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणचाही आक्षेप नाही – शरद पवार

Subscribe

पवारांनी हे सांगितले असले तरी उदयनराजेंना उमेदवारी मिळणारच असे मात्र नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुणे : उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणाचाही आक्षेप नाही. सातारा जिल्हाध्यक्ष आणि संबंधित पदाधिकार्‍यांच्या बैठकीत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र पवारांनी हे सांगितले असले तरी उदयनराजेंना उमेदवारी मिळणारच असे मात्र नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केला, अशा बातम्या माध्यमात आल्या होत्या. तसेच लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उदयनराजे नको, इतर कुठलाही उमेदवार द्या, असा सूर सातार्‍यातील नेत्यांचा होता. याबाबत खासदार उदयनराजेंना संबंधित बैठकीचा वृत्तांत पोहोचताच, त्यांनी थेट पुणे गाठले. त्यानंतर, सायंकाळी 6 वाजता पुण्यातील मोदीबाग या विश्रामस्थानी पवार आणि उदयनराजे यांचीही लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली. त्यावेळी, सकाळच्या बैठकीबाबत उदयनराजेंनी पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यावर उदयनराजेंना हवं असलेलं उत्तर मिळविण्यासाठी वाट पाहण्यास सांगितली अशाही बातम्या होत्या. त्यामुळे , पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

सातार्‍यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत माझी बैठक झाली. आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन बैठका घेतल्या. लोकसभेसाठी उदयनराजेंच्या नावाला कोणीही विरोध केला नाही. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असे पवार यांनी म्हटले. दरम्यान, लवकरच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

राफेलची किमत उघड करा

राफेल विमान खरेदी देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. मी देखील संरक्षणमंत्री होतो. त्यामुळे राफेल खरेदीची तांत्रिक माहिती न देता किंमत सांगायला काहीच हरकत नाही. सरकार ही माहिती गोपनीय असल्याचा दावा करत आहे. तंत्रज्ञानाचा भाग सोडून किंमत जाहीर करणे गरजेचे आहे. बोफोर्स प्रकरणात भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि इतर नेत्यांनी अशाच प्रकारची मागणी केली होती. यामुळे यामध्ये गैर काही नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -