घरमहाराष्ट्रलोकप्रतिनिधींना येणार्‍या धमक्यांची होणार चौकशी

लोकप्रतिनिधींना येणार्‍या धमक्यांची होणार चौकशी

Subscribe

एसआयटीच्या प्रमुखपदी मिलिंद भारंबे यांची नियुक्ती

लोकप्रतिनिधींना येणार्‍या धमक्या आणि लोकप्रतिनिधींवर होणार्‍या हल्ल्यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुखपदी सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाचा अहवाल 3 महिन्यांत राज्याच्या गृह विभागाला सादर होईल.

लोकप्रतिनिधींना येणार्‍या धमक्यांचा मुद्दा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजला होता. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मध्यंतरी धमकी आली होती. आदित्य ठाकरे यांना धमकी देणार्‍या जयसिंग राजपूतला बंगळुरू येथे अटक झाली होती. हा मुद्दा शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.लोकप्रतिनिधींना येणार्‍या धमक्या आणि होणार्‍या हल्ल्यांचा सर्वच पक्षाच्या आमदारांनी निषेध केला होता.

- Advertisement -

त्यावर राज्यातील लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकामार्फत(एसआयटी) चौकशी करण्यात येईल. धमक्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या संदर्भात निश्चित धोरण आखले जाईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार एसआयटीच्या प्रमुखपदी मिलिंद भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या तपास पथकामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ज्ञ व्यक्तींना बोलावण्याचे अधिकार मिलिंद भारंबे यांना दिले आहेत. एसआयटीसाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याचे अधिकारही त्यांना दिले आहेत. राज्यातील लोकप्रतिनधींना आलेल्या धमक्या तसेच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा आणि दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आढावा हे पथक घेईल. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने करायच्या उपाययोजना तसेच कार्यवाहीबाबत शिफारस करण्याची जबाबदारी एसटीआटीवर सोपवण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने चौकशीची कारवाई 3 महिन्यांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना गृह विभागाने जारी केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -