घरमहाराष्ट्रविशाखापट्टणम-कुर्ला एक्स्प्रेसमध्ये चोरटयांचा धुडगूस

विशाखापट्टणम-कुर्ला एक्स्प्रेसमध्ये चोरटयांचा धुडगूस

Subscribe

विशाखापट्टणम-कुर्ला एक्स्प्रेस वाकाव स्थानकावरून पुण्याच्या दिशेने जात असताना चोरट्यांनी सिग्नल यंत्रणा बाधित करून गाडीत धुडगूस घातल प्रवाशांचे सोने पळवून नेले.

विशाखापट्टणम-कुर्ला एक्स्प्रेस वाकाव स्थानकावरून पुण्याच्या दिशेने जात असताना चोरट्यांनी सिग्नल यंत्रणा बाधित करून गाडीत धुडगूस घातला. एस १, एस५ ,एस ७ आणि एस ८ या क्रमाकांच्या डब्यातील प्रवाशांकडून सोने लुटून पसार झाले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द पुणे लोहमार्ग पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. रात्री दोनच्या सुमारास वाकाव स्थानकावर विशाखापट्टणम एक्स्प्रेस येण्यापूर्वी काही मिनिटे आंधी सिग्नल बाधित करण्यात आले. गाडी वाकाव स्थानकाच्या अपलाइन येण्यापूर्वीच सिग्नलचा लाल दिवा लागला. चालकाने लगेच गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर चोरट्यांनी डब्यात प्रवेश करून प्रवाशांकडील सोने पळवले. या प्रकरणी एम. एस. लक्ष्मी, सुविरा देवी आणि एन. महालक्ष्मी यांनी तक्रार दाखल केली. जवळपास ४ लाख ६८ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची तक्रार प्रवाशांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -