घरताज्या घडामोडीभाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मोदींचे मराठीत ट्वीट, मान्यवरांची श्रद्धांजली

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मोदींचे मराठीत ट्वीट, मान्यवरांची श्रद्धांजली

Subscribe

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (60) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे.

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (60) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनांतर देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. (This leaders paid tribute to BJP senior MLA Laxman Jagtap)

पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -

नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

“आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी-चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत होते. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माझे मित्र आणि सहकारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारे आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

 “विधानभवनात पीपीई कीट घालून त्यांचे मतदानाला येणे आणि त्यावेळी अत्यंत प्रेमाने मला दिलेली हाक मी कधीच विसरू शकणार नाही. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. मन सुन्न आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे 

मनसेने वाहिली लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

भाजपा नेते छत्रपती उदयनराजे भोसले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -