घरमहाराष्ट्रयंदाचा जनस्थान पुरस्कार कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर

यंदाचा जनस्थान पुरस्कार कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर

Subscribe

मराठी साहित्य क्षेत्रात मानाचा आणि मराठी साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका तथा कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे.

मराठी साहित्य क्षेत्रात मानाचा आणि मराठी साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका तथा कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह मकरंद हिंगणे, विश्वस्त माजी आमदार हेमंत टकले, वकील विलास लोणारी यांनी ही घोषणा केली. (This year Janasthan Award was announced to novelist Asha Bage)

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्ष जनस्थान पुरस्कार, तर एक वर्ष गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येतात. यातील जनस्थान पुरस्कार हा साहित्य क्षेत्रासाठी तर गोदावरी गौरव हा पुरस्कार कला, साहित्य, संस्कृती या क्षेत्रांतील मान्यवरांना दिला जातो. यंदा जनस्थान पुरस्काराचे वर्ष असल्याने जनस्थान पुरस्कार निवड समितीने आशा बगे यांच्या नावाची एकमताने निवड केली. १० मार्च रोजी कुसुमाग्रजांच्या स्मरणदिनी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी ६ वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. १ लाख रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

- Advertisement -

पत्रकार परिषदेला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त लोकेश शेवडे, अ‍ॅड. अजय निकम, अ‍ॅड. राजेंद्र डोखळे, प्रकाश होळकर, अरविंद ओढेकर आदी उपस्थित होते. पुरस्कार निवड समितीत संध्या नरे-पवार, डॉ. अनुपमा उजगरे, प्रफुल्ल शिलेदार, डॉ. सदानंद बोरसे, अविनाश सप्रे यांचा समावेश होता.

आशा बगे यांचा परिचय
आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नोकरी न करता घरसंसार सांभाळून त्यांनी लेखनाचा छंद जोपासला. बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रूक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. त्यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे. ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबर्‍यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ ला २००७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमीळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. दर्पण हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी त्यांना केशवराव कोठावळे पुरस्कार मिळाला. त्यांना संगीताची विशेष आवड आहे. संगीतावर त्यांनी बरेच लिखाणही केले आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठ्या आणि एकत्रित कुटुंबात गेले. त्यामुळे अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -