घरमहाराष्ट्रसेल्फी काढण्याचा मोह, बेतला कुटुंबाच्या जीवावर

सेल्फी काढण्याचा मोह, बेतला कुटुंबाच्या जीवावर

Subscribe

संग्रामपूर येथील खिरोडा पुलाजवळ चव्हाण कुटुंबाचा सेल्फीने घात केला.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे सेल्फी काढण्याच्या मोहापायी एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे. संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदीच्या खिरोडा पुलाजवळ चव्हाण कुटुंबाचा सेल्फीने घात केला. श्रावण चव्हाण (११) हा मुलगा नदीवर कुटुंबासहित सेल्फी घेत होता. यावेळी हा मुलगा पाण्याच्या प्रवाहामुळे नदीत पडला. मुलाला वाचवण्यासाठी आई-वडीलांनी देखील नदीत उडी मारली. मात्र मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगात सुरु झाला आणि त्या प्रवाहात चव्हाण कुटुंबीय वाहून गेले.

नेमके काय घडले?

चव्हाण कुटुंबीय बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यात राहत होते. वडील राजेश चव्हाण (४२) हे बुलडाणा अर्बन पतसंस्थेत कार्यरत होते. यांनी नुकतीच एक दुचाकी खरेदी केली होती. नवीन दुचाकी घेतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हे कुटुंब शेगावला फिरायला गेले होते.

- Advertisement -

शेगावरुन परतत असताना हे कुटुंब संग्रामपूर येथील नदीच्या खिरोडा पुलाजवळ थांबले. त्याचवेळी श्रावणला सेल्फिचा मोह झाला. पुर्णा नदीला आपल्या सेल्फीत सामावून घेण्याच्या नादात श्रावण पाण्यात खेचला गेला. त्याला वाचवण्यासाठी वडील राजेश चव्हाण देखील उतरले. मात्र वडील देखील बुडत असल्याचे पाहिल्याने आई सारिका चव्हाण (३५) यांनी देखील नदीत उडी मारली. आई आणि वडील एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडाले. हा संपूर्ण प्रकार पुलावरुन जाणाऱ्या गावकऱ्यांच्या लक्षात आला. त्यांना वाचवण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -