घरताज्या घडामोडीToilet Scam : माझ्यावर लावलेले आरोप खोटे, शौचालय घोटाळ्या प्रकरणी सोमय्यांकडून पत्राद्वारे...

Toilet Scam : माझ्यावर लावलेले आरोप खोटे, शौचालय घोटाळ्या प्रकरणी सोमय्यांकडून पत्राद्वारे स्पष्टीकरण

Subscribe

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा शौचालय घोटाळा केला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांनी सोमय्यांवर आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी जमा केलेल्या पैशाचा अपहार केल्याचा आरोपही केलाय. परंतु शौचालय घोटाळ्यात सोमय्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. राऊतांच्या आरोपानंतर सोमय्यांनी आता वेगवेगळ्या विभागांना पत्र लिहून आपण घोटाळा केला नसल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. राजकीय हेतूने आरोप करण्यात आला असून कारवाईपूर्वी आमच्याशी संपर्क साधा असे किरीट सोमय्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर आता सोमय्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सोमय्यांनी नगरविकास खात्याचे सचिव, एमएमआरडीए, मुंबई पोलीस, मीरा-भाईंदर पोलीस, मीरा भाईंदर महानगरपालिका, वन खाते या विभागांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

- Advertisement -

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्रामध्ये असे म्हटलं आहे की, माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. हा प्रकल्प पथदर्शी होता आणि यातील जमीनसुद्धा सरकारची आहे. माझ्यावर राजकीय हेतूने आरोप करण्यात आला आहे. कोणत्या आधारावर १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. कोणत्याही बाबतीमध्ये कारवाई करण्यापूर्वी आमच्यासोबत संपर्क करावा तसेच आम्हाला विचारणा करावी असे सोमय्या म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण ?

युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा सोमय्या यांनी सार्वजनिक शौचालयांची कंत्राटे मिळवून तब्बल १६ ठिकाणी अशी बांधकामे केली. त्यांनी मीरा-भाईंदर महापालिका अधिकार्‍यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून शौचालयांची ३ कोटी ९० ५२ रुपयांची बिलेसुद्धा घेतली, अशी तक्रार करण्यात आली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनात गृहराज्यमंत्री यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त व आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी १८ मार्च २०२१ रोजी शासनाकडे अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार १६ ठिकाणी युवक प्रतिष्ठानने कांदळवन तसेच सीआरझेड व बफर झोन क्षेत्रात शौचालयांची बांधकामे केली असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत स्फोटामुळे कंपनीला भीषण आग, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -