Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Narendra Modi : ब्रिटनचे PM जॉन्सन यांचा भारत दौरा, 'या' मुद्द्यांवर होणार...

Narendra Modi : ब्रिटनचे PM जॉन्सन यांचा भारत दौरा, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

Subscribe

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन २१ एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बोरिस जॉन्सन यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये जॉन्सन गुजरातमधून दौऱ्याची सुरूवात करणार आहेत. या दौऱ्यामध्ये जॉन्सन गुंतवणूक आणि संबंधित व्यावसायिक उद्योगपतींना भेट देणार आहेत. त्यानंतर ते २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय-ब्रिटिश नागरिकांपैकी निम्म्याहून अधिक गुजराती वंशाचे आहेत. त्यामुळे डायस्पोरा कनेक्ट म्हणूनही ते महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने या दौऱ्यात नेमकी कोणती चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यापूर्वी २०२१ मध्ये दोन्ही नेत्यांमध्ये आभासी बैठक झाली होती. मात्र, त्यावेळी २०३० च्या रोडमॅपवर चर्चा झाली होती. हा रोडमॅप आरोग्य, हवामान, व्यापार, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील युके आणि भारत संबंधांसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतो. या बैठकीवेळी दोन्ही देशांनी संबंधांचा दर्जा सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये वाढवण्यासही सहमती दर्शवली होती.

- Advertisement -

गेल्या महिन्यात ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणादरम्यान Wider Diplomatic Push चे सदस्य म्हणून भारताला भेट दिली. तसेच मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये परराष्ट्र सचिव म्हणून त्यांची ही दुसरी भेट होती. ब्रेक्झिटनंतर, ब्रिटन भारताच्या इंडो-पॅसिफिक महासागर उपक्रमात सामील होईल आणि सागरी सुरक्षा मुद्द्यांवर प्रमुख भागीदार बनेल. सध्या यूके आणि भारत यांच्यातील व्यापार दरवर्षी सुमारे £23 अब्ज इतका आहे.


- Advertisement -

हेही वाचा : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत स्फोटामुळे कंपनीला भीषण आग, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -