घरताज्या घडामोडीनाशिकरोडच्या भरवस्तीत बिबटयाचा थरार

नाशिकरोडच्या भरवस्तीत बिबटयाचा थरार

Subscribe

जयभवानी परिसरात बिबटयाचे दर्शन, परिसरात नागरिकांची गर्दी

उपनगर परिसरातील जयभवानी रोड भागात सोमवारी सकाळच्या सुमारास बिबटयाचे दर्शन झाले. परिसरातील बिबटयाचा वावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाच्या मदतीने बिबटयाचे शोधकार्य सुरू आहे.

जय भवानी रोड परिसरात सकाळी स्थानिक नागरिकांना बिबटयाचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. याबाबत वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होत रेस्क्यु ऑपरेशन सुरू झाले. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या महापालिकेच्या मोकळया जागेवर बिबटया दिसून आल्याचे सांगण्यात आले. सकाळी या बिबट्याला काही महिलांनी पाहिले असता त्यांनी ही बाब आजूबाजूच्या नागरिकांना सांगितली. तसेच बिबट्या दिसताच कुत्रे भुंकू लागल्याने त्या ठिकाणी गर्दी झाली होती. परिसरात बिबटया शिरल्याची माहिती मिळताच बिबटयाला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बचाव कार्यात वनविभागाला मोठे अडथळे येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -