घरमहाराष्ट्रTRP घोटाळ्यात मोठी कारवाई; BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना अटक

TRP घोटाळ्यात मोठी कारवाई; BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना अटक

Subscribe

TRP घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी BARC चे (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) माजी सीओओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) रोमिल रामगढिया यांना अटक केली आहे. TRP घोटाळ्याप्रकरणी चौदावी अटक आहे. या प्रकरणात प्रेक्षक संख्येची पाहणी करणाऱ्या संस्थेशी संबंधित व्यक्तीला पहिल्यांदाच अटक करण्यात आली आहे. TRP घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केल्यानंतर रोमिल रामगढिया यांना केलेली अटक महत्त्वाची मानली जातेय.

TRP घोटाळ्यात रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केल्यानंतर रोमिल रामगढिया यांना केलेली अटक महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. बार्क (BARC) म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही संस्था टीव्ही चॅनेल्सची प्रेक्षकसंख्या मोजते. या संस्थेने सूचवल्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी TRP घोटाळ्याचा तपास सुरु केला आहे. त्या बार्क संस्थेच्या माजी कार्यकारी प्रमुखाला म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला अटक करण्यात आली आहे. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक केली. रोमिल रामगढिया यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रोमिल रामगढिया यांनी जुलै २०२० मध्ये बार्कमधील सीओओ पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा बार्कमधील कार्यकाल हा तब्बल सहा वर्षांचा होता.

- Advertisement -

TRP घोटाळ्याचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी माध्यम क्षेत्रात खळबळ माजवून दिली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्वात आधी हंसा रिसर्च या संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली होती. हंसा रिसर्चच्या दोन कर्मचाऱ्यांसोबतच ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ या मराठी चॅनेलच्या मालकांनाही अटक करण्यात आली होती. हंसा रिसर्चच्या कर्मचाऱ्यांवर ज्या घरात पीपल मीटर बसवण्यात आले आहे, त्यांना ठराविक चॅनेल पाहण्यासाठी पैसे देत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -