घरमहाराष्ट्रतुकाराम मुंढेंची कमाल; मंदिरात आरतीही केली आणि कारवाईही!

तुकाराम मुंढेंची कमाल; मंदिरात आरतीही केली आणि कारवाईही!

Subscribe

तुकाराम मुंढे कालिका मंदिराचे प्रमुख पाहुणे होते. प्लास्टिकच्या पिशव्या त्यांना निदर्शनास आल्या. त्यामुळे त्यांनी स्टॉलची पाहणी सुरू करून प्रसादाच्या स्टॉलवर कारवाई केली.

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडक कारवाईमुळे राज्यभरात प्रचलित आहेत. आज त्यांनी अशीच एक धडक कारवाई केली आहे. ही कारवाई त्यांनी नाशिक येथील कालिका मंदिरातल्या प्रसादाच्या स्टॉलवर केली. प्लास्टिकच्या विरोधात त्यांनी ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या स्टॉलधारकांनी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असाही इशारा मुंढे यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण?

नवरात्री निमित्ताने बुधवारी तुकाराम मुंढे यांना नाशिकच्या कालिका मंदिरात आरतीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. तुकाराम मुंढे हे या आरतीचे प्रमुख पाहुणे होते. सकाळी ८.३० वाजता ते कालिका मातेच्या मंदिरात आले. मंदिराच्या बाहेर लागलेल्या प्रसादाच्या स्टॉलवर त्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या बघितल्या. आरती झाल्यावर त्यांनी सर्व प्रसादाच्या स्टॉलची पाहणी केली. तिथे सर्रास प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरू होता. ते पाहून तुकाराम मुंढे चांगलेच भडकले. त्यांनी त्या सर्व प्रसादाच्या स्टॉलवर कडक कारवाई केली. शिवाय, संध्याकाळपर्यंत प्लास्टिच्या पिशव्यांचा वापर बंद केला नाही तर त्यांचे स्टॉल तिथून हटवले जातील, असा देखील इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.

- Advertisement -

कोण आहेत तुकाराम मुंढे?

मूळचे बीडचे असेलेले तुकाराम मुंढे २००५ सालच्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. नोकरीमध्ये आजवर अनेकदा त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मुंढे यांच्या कामाची पद्धत स्थानिक राजकारण्यांना न पटल्याने त्यांच्या वारंवार बदल्या झाल्याचं बोललं जातं. २०१६ साली मुंढे यांनी नवी मुंबईचे आयुक्त पद भूषविले. पदभार स्विकारल्यानंतर अनधिकृत बांधकामांविरोधात त्यांनी सुरु केलेल्या मोहिमेमुळे सर्वांची पाचावर धारण बसली होती. कामचुकारपणामुळे तब्बल ८०० कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कामावरून बडतर्फ करण्याचा त्यांचा निर्णय विशेष चर्चेत आला होता. मात्र, तिथूनही त्यांची बदली करून त्यांना पुण्यात पाठवण्यात आलं. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर त्यांची बदली नाशिकचे आयुक्त म्हणून करण्यात आल्याचं सांगितलं जातं.


संबंधित बातम्या – 

- Advertisement -

माझा कारभार पारदर्शक तरिही अविश्वास ठराव का? – तुकाराम मुंढे

तुकाराम मुढेंविरोधात नाशिकमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक, अविश्वास प्रस्ताव तयार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -