घरताज्या घडामोडीपुण्यात ‘सैराट’; बहिणीच्या प्रियकराची हत्या

पुण्यात ‘सैराट’; बहिणीच्या प्रियकराची हत्या

Subscribe

बहिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बहिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला असून यामध्ये आयान जावेद घानपुरे (१७) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार; वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या आयन घानपुरे या तरुणाचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याची माहिती मुलीच्या भावांना समजली होती. यावरुन त्यांच्यात आधी भांडण देखील झाली होती. पण, त्यांनी हे भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न देखील केले.

- Advertisement -

दरम्यान, आयान याला सिगारेट ओढवण्याची सवय होती. त्यामुळे या दोघा अल्पवयीन मुलांनी त्याला सिगारेट ओढण्यासाठी एम्प्रेस गार्डन परिसरात नेले. आयानखाली बसून सिगारेट ओढत होता. तिच संधी साधत त्यातील एकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याचा जीव जाईपर्यंत त्याच्यावर चाकूने वार केले. जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह जवळच असणाऱ्या कॅनॉलमध्ये टाकला आणि तिथून पळ काढला. अशाप्रकारे खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नाना पेठेत या दोघांनाही फिरत असताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


हेही वाचा – Weather Alert: येत्या २४ तासांत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -