घरमहाराष्ट्रमराठवाडाUday Samant : प्रचारसभेवेळी मंत्री उदय सामंतांची गाडी फोडली, अज्ञाताचा शोध सुरू

Uday Samant : प्रचारसभेवेळी मंत्री उदय सामंतांची गाडी फोडली, अज्ञाताचा शोध सुरू

Subscribe

महायुतीच्या यवतमाळ-वाशिमच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारसभेत मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला आहे. मंत्री सामंत वाहनात नसताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे.

यवतमाळ : राज्यात लोकसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक पक्ष जोमाने प्रचार करताना पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उमदेवरांचा प्रचार करण्यात व्यस्त असून रविवारी (ता. 21 एप्रिल) सामंत यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली होती. राळेगाव येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, या प्रचारसभेवेळी एका अज्ञाताकडून मंत्री सामंत यांच्या ताफ्यातील गाडी फोडण्यात आली. या घटनेमुळे काही काळासाठी प्रचारसभेच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. (Uday Samant vehicle was attacked by unknown persons at Yavatmal Ralegaon)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी महायुतीकडून शिंदे गटाच्या उमेदवार असलेल्या राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. परंतु, उदय सामंत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर येण्यापूर्वी सभास्थळी पोहोचले. त्यानंतर ते मंचावर बसल्यानंतर सभा मंडपाबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनातील एका ताफ्यावर अज्ञाताकडून दगड भिरकावण्यात आला. हा दगड ताफ्यातील एका गाडीवर बसल्यानंतर त्या वाहनाची काट फुटली.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींना आव्हान

मंत्री उदय सामंत यांच्याच ताफ्यातील वाहनाची काच फुटल्याची माहिती वाऱ्यासारखी सभास्थळी पोहोचल्यानंतर त्याठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेनंतर पोलिसांनी लागलीच अज्ञाताचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण नेमका हा दगड कोणी भिरकावला आणि सभेच्या स्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण केले, याबाबतची कोणतीही समोर येऊ शकली नाही. मात्र, या घटनेनंतर सभास्थळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती. या घटनेबाबत मंत्री उदय सामंत यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. माझ्या वाहनावर कोणी हल्ला केला याची कल्पना नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

ज्या वाहनात बसणार होतो, त्यावर हल्ला…

या घटनेबाबत मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, वाशिम-यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी राळेगावमध्ये असताना, ज्या वाहनात बसणार होतो, त्या कारवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला. यामुळे कारची काच फुटली. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पाहिली आणि खात्री करून घेतली. तेव्हा हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. मात्र, या प्रकारात कुणालाही दुखापत झालेली नाही. मी या कारमध्ये नसल्याने सुखरूप आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

पुण्यातही झाला होता असाच हल्ला…

मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर अशा प्रकारे हल्ला होण्याची ही काही पहिलीच घटना नसून, याआधी पुण्यात देखील त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता. त्या घटनेची आठवण करून देत मंत्री सामंत म्हणाले की, हा अनुभव मला काही नवीन नाही. कारण पुण्यामध्ये ही अशा प्रकारचा हल्ला माझ्यावर झाला होता. परंतु, हा हल्ला का, कशासाठी, काय उद्देश्याने झाला, कोणी दगड मारला हे कळालेले नाही. दक्षता म्हणून आणि पोलीस दरबारी याची नोंद असावी म्हणून या हल्ल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यासाठी कार चालकास पाठवले आहे, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : आरोप-प्रत्यारोपात राणा पाटलांचे ओमराजेंना आव्हान; म्हणाले …तर राजकारण सोडीन


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -