घरताज्या घडामोडीUnseasonal Rain : राज्यातील वातावरणात बदल; काही ठिकाणी ऊन तर, अनेक भागांत...

Unseasonal Rain : राज्यातील वातावरणात बदल; काही ठिकाणी ऊन तर, अनेक भागांत मुसळधार

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. राज्यात एकिकडे पाऊस असताना दुसरीकडे काही भागांत उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. राज्यात एकिकडे पाऊस असताना दुसरीकडे काही भागांत उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. तापमानात सतत होणाऱ्या वाढीमुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. अशात, राज्याच येत्या 25 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (heatwave in mumbai and unseasonal rain in maharashtra imd predicts)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस किनारपट्टीच्या भागात तापमानात वाढ होणार आहे. आद्रता वाढल्यामुळे उकाडयात वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिमी थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील तापमानात घट झाली असून, उत्तर कोकणात तापमानात काहीशी घट होईल. तर मुंबईपासून दक्षिणेकडे असणाऱ्या किनारपट्टीवर वाढत्या तापमान घट होण्याची शक्यता आहे. आज (22 एप्रिल) विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या झळा बसणार आहे. अरबी समुद्रावरुन आर्द्रतायुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्याने 25 एप्रिलपर्यंत उकाडा जाणवणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raigad Water Crisis : म्हसळ्याच्या १०० कोटींच्या योजना ‘पाण्यात’च

कोकण किनारपट्टीसह मुंबईत पुन्हा तापमान वाढलं आहे. अरबी समुद्रावरून आद्र्रतायुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्यामुळे गुरुवार, 25 एप्रिलपर्यंत किनारपट्टीवर उकाडा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शिवाय, राज्याच्या अन्य भागात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाडयात तुरळक प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात एकिकडे अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे कोकणासह मुंबई, ठाण्यात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. परिणामी वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे नागरिक हैरणा झाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे आजार तर वाढतातच पण जीवाला धोकाही वाढतो.


हेही वाचा – Latur Rain Update : अवकाळी पावसामुळे लातुरकर हैराण; वीज पडून 2 क्तींसह 13 जनावरांचा मृत्यू

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -