घरमहाराष्ट्रउदयनराजे पवारांच्या भेटीला; उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार?

उदयनराजे पवारांच्या भेटीला; उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार?

Subscribe

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी गेले आहेत. या बैठकीसाठी धनंजय मुंडे देखील उपस्थित आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर आहेत. दोन दिवसांपूर्वी उदयनराजेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर उदयनराजे यांची साताऱ्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत भाजप प्रवेशाबाबत चर्चा होणार होती. या चर्चेबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज सकाळी दहा वाजता उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्याच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी गेले आहेत. उदयनराजेंच्या मनधरणीसाठी पवार यांच्या घरी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे देखील बैठकीसाठी येणार आहेत. त्यामुळे उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहतील की पक्षांतर करतील हे लवकरच स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी केले उदयनराजेंच्या मनधरणीचे प्रयत्न

उदयनराजे भोसले साताऱ्यातील मोठे नाव आहे. जनसामान्यांमध्ये त्यांच्याप्रती आदर आणि आत्मीयता आहे. साताऱ्यातील जनता उदयनराजेंवर प्रेम करते. त्यामुळे उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान होईल. उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांचे मनधरणी करण्याचे भरपूर प्रयत्न केले. गेल्या आठवड्यात अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांची यासंदर्भात बैठक झाली. बैठक झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी ‘मावळा छत्रपतींना फक्त विनंती करु शकतो’, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे या बैठकीत अमोल कोल्हेंना उदयनराजेंची मनधरणी करण्यात अपयश आल्याचे बोलले जात होते. अमोल कोल्हे यांच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील उदयनराजेंना पक्ष न सोडून जाण्याची विनंती केली होती. मात्र, तरीही उदयनराजे भाजप प्रवेशावर ठाम असल्याचे बोलले जात होते. आजच्या बैठकीत उदयनराजेंचे मनधरणी करणात शरद पवरांना यश येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -