घरमहाराष्ट्रसेनेच्या व्यासपीठावर 'रामा'च्या मूर्तीला प्राधान्य!

सेनेच्या व्यासपीठावर ‘रामा’च्या मूर्तीला प्राधान्य!

Subscribe

सेना पक्षप्रमुखांनी व्यासपीठावर आगमन केल्यानंतर प्रथम रामाच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरांचा मुद्दा किती गांभिऱ्याने आणि प्राधान्य देऊन घेतल्याचे हे समजते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपूर दौऱ्यावर असून त्यांची महासभा पंढरपूरात होत आहे. दरम्यान, सेनेच्या व्यासपीठावर एक नवीन गोष्टी पाहायला मिळाली. व्यासपीठावर विठूमाऊली, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतरांच्या प्रतिमा असतानाच प्रथमच रामाची भलीमोठी मूर्तीही या व्यासपीठावर पाहायला मिळाली. यापूर्वीही कधीही सेनेच्या व्यासपीठावर ही मूर्ती असल्याचे पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरांचा मुद्दा किती गांभिर्याने तसेच प्राधान्याने घेतलाय, हे समजते. सेना पक्षप्रमुखांनी व्यासपीठावर आगमन केल्यानंतर प्रथम रामाच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विठुरायांच्या मूर्तीला तुळशीची माळ घातली आणि त्यानंतर सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घातला.

वाचा : उद्धव ठाकरेंची पंढरपूर वारी LIVE UPDATE : ‘पहारेकरी देखील चोरी करतात’

- Advertisement -

गेल्याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली होती. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्याचे जाहीर केले होते. नुसार त्यांनी अयोध्येचा दौरा केला. आज या घटनेला बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. दसरा मेळाव्यापासून शिवसेनेने त्यांच्या पक्षाचा प्रमुख मुद्दा राम मंदिर असल्याचे सातत्याने पाहायला मिळाले आहे. कोणत्याही व्यासपीठावर ते आधी राम मंदिराबाबत बोलतात, नंतर सगळे विषय येतात. त्यामुळे हिंदुत्वावर हिरहिरीने बोलणारे उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्याला सध्या प्राध्यान दिल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा : अयोध्येत आज हिंदू विश्व परिषदेची महासभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -