घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : गद्दारांना पन्नास खोक्यांचा हमीभाव, पण...; शेतकरी प्रश्नांवर ठाकरेंचा संताप

Uddhav Thackeray : गद्दारांना पन्नास खोक्यांचा हमीभाव, पण…; शेतकरी प्रश्नांवर ठाकरेंचा संताप

Subscribe

बुलढाणा : एमएसपी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही दुष्काळाचा फटका बसला आहे. याचपार्श्वभूमीवर आज जनसंवाद मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारसह एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधाल आहे. गद्दारांना पन्नास खोक्यांचा हमीभाव पण जो शेतकरी सोनं पिकवतो तो, आत्महत्या करतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Guarantee of fifty boxes to traitors Uddhav Thackerays anger on farmer issues)

हेही वाचा – Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाचं नाव ‘धोंड्या’; ठाकरेंनी शहांवरही साधला निशाणा

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की, संजय राऊत जसं बोलले गद्दारांना हमीभाव आहे पन्नास खोक्यांचा, पण माझा शेतकरी जो सोनं पिकवतो तो आत्महत्या का करतोय? बुलढाण्यामध्ये सुद्धा काय कमी आत्महत्या होतातच आहेत. आज सुद्धा दुष्काळाचा फटका इकडे बसलाय. दुष्काळ अगदी उंबरठ्यावर आहे. खरीप गेलं, रब्बी गेलेली आहे. हमीभाव मिळत नाही म्हणून ग्रामीण भागातले तरुण हे रोजगारासाठी शहरामध्ये निघालेले आहेत. त्यांना एकच आधार राहिला आहे, तो म्हणजे रोजगार हमी योजनाचा, मात्र बुलढाण्यामध्ये किमान साडेपाचशे गावामध्ये ही कामं सुरू झालेली नाही आहेत. आम्हाला ही माहिती मिळू शकते पण मुख्यमंत्र्यांना मिळू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी दारोदारी वणवण फिरण्यापेक्षा या लोकांना रोजगार हमी योजना द्यावी, कारण त्यांच्याकडे शेतीची कामं नाही आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – Uddhav Thackeray : जीव देण्यापेक्षा घेणारी माणसं तयार होत आहेत; ठाकरेंकडून भीती व्यक्त

- Advertisement -

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ तुम्हाल झाला की नाही? प्रधानमंत्र्यांनी उज्वला योजना आणली गॅस सिलेंजरचा किती जणांना लाभ झाला? प्रधानमंत्री आवास योजनेतून किती जणांना घरं मिळाली? काहीच नाही आहे. असे असतानाही सरकारकडून फोन करून विचारणार की, मोदी सरकारच्या योजनांबद्दल माहिती आहे का? तुम्हाला या योजनेचा फायदा झाला का? झाला म्हटल्यावर यांना आनंद होतो. मग ते विचारतात प्रधानमंत्री आवास योजनेत तुम्हाला घर मिळालं का? हा म्हटल्यावर ते विचारतात, मग तुम्ही परत मोदी सरकारला मत देणार का? यावेळी एक शेतकरी म्हणतो की, यापूर्वी आम्ही भाजपाला मत दिलेलं आहे. पण आता आम्ही मुलाबाळांसह आत्महत्या करू, पण पुन्हा भारतीय जनता पक्षाला मत देणार नाही. का? तर सोयाबीनचे भाव काय आहेत? पूर्वी काय होते? आता काय आहेत? कापसाचे भाव काय आहेत? पूर्वी काय होते? आत्ता काय आहेत? बरं काही कायदा त्यांनी केला आहे. हमीभाव तुम्हाला किती पाहिजे होता? तुम्ही काहीही बोला, पण आम्ही जो काय बोलू तोच हमीभाव, असे सांगितले जाते.  बरं ठीक आहे तो तरी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -