घरमहाराष्ट्रअभ्यास करणे आमचे काम नाही, तर राजकारणात आलोच नसतो

अभ्यास करणे आमचे काम नाही, तर राजकारणात आलोच नसतो

Subscribe

इंधन दरवाढीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला. तसेच अभ्यास करणे आमचे काम नाही, तसे असते तर राजकारणात आलोच नसतो. पण मार्क देण्याचे काम आमच्याकडे आले आहे, असे मुख्यमत्री एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना उद्देशून मिश्किलपणे म्हणाले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अधिकार्‍यांशी झालेल्या संवादाचा हा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केला.

एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतोय हे केंद्राच्याही लक्षात आले आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढे वाढले, डिझेलचे भाव तेवढे झाले. तसे नाहीये. हे आपल्या भल्यासाठीच होतेय, असा चिमटा काढतानाच मी काही बोललो तर टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो असे म्हणता. पण मी खरे की खोटे बोलतो हे तुम्ही सांगा. इंधन परवडेनासे झाले तर तुम्ही म्हणतात तसे प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही? म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

- Advertisement -

एवढ्या मोठ्या प्रकल्पांबाबत तुम्ही अभ्यास केला आहे ना? अशी विचारणा मुख्यमंत्री यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना केली. अभ्यास करणे आमचे काम नाही, तसे असते तर राजकारणात आलोच नसतो. पण मार्क देण्याचे काम आमच्याकडे आले आहे, असे मुख्यमत्री उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले. कर्तव्य पार पाडताना राजकारण करू नये, राजकारण येऊ देणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जगात अनेक सुविधा सुरू होतात ज्या इथे नसतात. पण स्वयंचलित लोकल सेवा ही याआधीच आपल्याकडे आहे. प्लॅटफॉर्मवरून लोकलमध्ये ऑटोमेटिक चढणे आणि स्टेशन आल्यावर तसेच ऑटोमेटिक उतरणे हे जगात कुठेही नाहीये , असे मिश्किलपणे सांगत ३०-३५ वर्षांपूर्वी बेस्ट बस आणि लोकलने केलेल्या प्रवासाच्या आठवणी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -