घरमहाराष्ट्रदख्खनच्या राणीला नागझिर्‍याचा साज

दख्खनच्या राणीला नागझिर्‍याचा साज

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार शुभारंभ

पर्यटकांना विदर्भाकडे आकर्षित करण्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे दख्खनच्या राणीवर (डेक्कन क्विनवर) दिसणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी या निसर्गरम्य चित्रांची शाल पांघरलेल्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहे.

महाराष्ट्रात पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) विविध ठिकाणी २३ पर्यटक निवासे आहेत. त्यापैकी नागझिरा अभयारण्यातील बोधलकसा या ठिकाणी महामंडळाचे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त प्रशस्त पर्यटक निवास (रिसॉर्ट) आहे. या पर्यटक निवासाच्या बाजूला मोठे जलाशय असून सर्व बाजूंनी नागझिरा अभयारण्याची गर्द हिरवी झाडी आहे. अभयारण्याच्या परिसरात बाराही महिने वावर असलेले लाल डोक्याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर), विविध जातीचे गरूड, पोपट तसेच स्थलांतरीत पक्षी इत्यादी दुर्मिळ पक्षांची छायाचित्रे आता डेक्कन क्वीन एक्स्प्रेसवर झडकणार आहेत.

- Advertisement -

यासोबतच अभयारण्याचा परिसरात पडस व मोह फुलण्याच्या नेत्रसुखद दृष्यांची छायाचित्रेही डेक्कन क्वीन रेल्वेच्या बाह्यभागावर लावून या पर्यटक निवासाची प्रसिध्दी करण्यात येईल. या माध्यमातून पर्यटकांना नागझिरा अभयारण्य तसेच विदर्भाकडे आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येणार असल्याचे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले यांनी सांगितले. १७ बोगींवर ही चित्रे लावण्यात येणार असून एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद सिंगल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -