घरमुंबईआयआयटीमधील विद्यार्थी बेपत्ता

आयआयटीमधील विद्यार्थी बेपत्ता

Subscribe

देशभरातील आयआयटीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत देशातून ४४८ वा क्रमांक मिळवलेला व बारावीत ९६ टक्के गुण मिळूवन उत्तीर्ण झालेला हर्ष दिनेशकुमार शर्मा हा विद्यार्थी १५ दिवसांपासून हरवला आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलिस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत.

हर्षने आयआयटी मुंबईत पाच वर्ष एमटेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. तो सध्या तृतीय वर्षात शिकत होता. दोन वर्षांपासून तो तणावग्रस्त होता. त्याच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. यामुळे आयआयटीने विशेष दखल घेऊन त्याच्यासोबत एका पालकाला राहण्याची अनुमती दिली होती. त्याचे वडील सोबत राहात असताना २२ नोव्हेंबरला ते गावाला लग्नाला जाण्यासाठी निघणार होते. त्यामुळे त्याचे वडील तयारी करत होते. इतक्यात हर्ष मोबाइल किंवा अन्य कोणतेही गॅजेट न घेता कॅम्पसमधून बाहेर पडला.

- Advertisement -

तो कॅम्प्समधून बाहेर जाताना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. यानंतर बराचवेळ तो आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा तो कोठेच आढळून आला नाही. अखेर पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्याजवळ पैसे नाहीत, कोणतेही गॅजेट नाही तसेच तो नातेवाईक, मित्र मंडळी यांच्याकडे कोठेही सापडत नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -