घरताज्या घडामोडीशासकीय निधी पाठोपाठच, विद्यापीठांच्या ठेवीसुद्धा राष्ट्रीयकृत बँकेत

शासकीय निधी पाठोपाठच, विद्यापीठांच्या ठेवीसुद्धा राष्ट्रीयकृत बँकेत

Subscribe
मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांतील ठेवी खासगी बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्यात येतील, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले. शिवसेने आमदार मनीषा कायंदे यांनी सभागृहात याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उदय सामंत यांनी उत्तर दिले.
मनिषा कायंदे यांनी मुंबई विद्यापीठाने १४२ कोटींच्या मुदत ठेव कायंदे यांनी मांडला होता. राज्य सरकारने गुरुवारी (शुक्रवारी दि. १३ मार्च) सर्व स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थामधील शासकीय निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याबाबत शासन निर्णय काढला होता. मात्र तरिही मुंबई विद्यापीठाने अधिसभा सदस्यांच्या बैठकीनंतर १४२ कोटींच्या मुदत ठेव येस बँकेत ठेवल्याचा मुद्दा मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, अधिसभेच्या बैठकीपुर्वीच येस बँकेत ठेवी जमा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, आता शासन निर्णयानुसार सर्व विद्यापीठे आणि संलग्न संस्थांच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्येच ठेवण्याच्या सूचना दिल्या जातील. शिवाय, येस बँकेत ठेवी ठेवताना विद्यापीठांनी काही अनियमितता केली असेल तर तपास करून कारवाई करण्याचे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -