घरताज्या घडामोडी'मास्क आणि सॅनिटायझर'ची जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर एफडीएची नजर

‘मास्क आणि सॅनिटायझर’ची जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर एफडीएची नजर

Subscribe

'मास्क आणि सॅनिटायझर'ची जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर एफडीएची करडी नजर असणार आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मास्क आणि सॅनिटायझरची विक्री जोरात सुरू असून याचा परिणाम मुंबईकरांवर झाला आहे. यालाच आळा बसावा यासाठी एफडीएने कडक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जास्त दराने मास्क आणि सॅनिटायझर विकणाऱ्यांवर एफडीएकडून धडक कारवाई केली जाणार आहे.

विक्रेत्यांवर होणार कारवाई

दरम्यान, गुरुवारी अन्न आणि औषध विभागाने केलेल्या कारवाईत मुंबईतील तीन कंपन्यावर धाड टाकत यातून चार लाखांचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे. करोना विषाणूमुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवाय, त्याचा गैरफायदाही घेतला जात आहे. अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझर विक्री होत असल्याच्या तक्रारी एफडीएला दिल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन एफडीएने कारवाई सुरू केली आहे. तसेच, मास्क आणि सॅनिटायझर जास्त दराने विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश ही एफडीए आयुक्त यांनी दिले आहेत. त्यानुसार, यापुढे अशी विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- Advertisement -

गुरुवारी वाकोला परिसरातील संस्कार आयुर्वेद या कंपनीवर छापा घातला. या कारवाईत एक लाख १० हजारांचा बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला. तसेच, दुसऱ्या कारवाईत चारकोप भागात ओम ज्योती एजन्सीच्या कार्यालयात विनापरवाना उत्पादित केलेला एक लाख १५ हजारांचा हँड सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला आहे. कांदिवली पूर्व भागातील रिद्धीसिद्धी एंटरप्रायजेस या कंपनीवर टाकलेल्या छाप्यात एक लाख ७२ हजारांचा बनावर सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला आहे.


हेही वाचा – करोना रूग्णाला घरातच क्वारनटाइन (विलगणीकरण) कसे कराल? आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शके जाहीर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -