घरमहाराष्ट्रपुणेVallabh Benke Passes Away : राष्ट्रवादीचे जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन

Vallabh Benke Passes Away : राष्ट्रवादीचे जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन

Subscribe

वल्लभ बेनके हे सलग सहावेळा 1985 ते 2009 या कालावधीत जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यापैकी चार वेळा वल्लभ बेनके यांचा विजय झाला होता.

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन झाले. काही महिन्यांपासून वल्लभ बेनके यांची प्रकृती खालावलेली होती. वल्लभ बेनके यांनी वयाच्या 74 वर्षी अखरेचा श्वास घेतला. वल्लभ बेनके यांचे रविवारी (11 फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास यांनी अखेरचा श्वास घेतला. वल्लभ बेनके यांचे पुत्र अतुल बेनके हे आमदार आहेत. वल्लभ बेनके यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वल्लभ बेनके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वल्लभ बेनके यांचे पार्थिव आज सकाळी 9 ते 12 यावेळत नारायणगाव येथे अंतिम दर्शनासाठी ठेवणार आहेत. वल्लभ बेनके यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता जुन्नर येथील हिवरे बुद्रुक येथे अंत्यसंस्कार होणार आहे. वल्लभ बेनके हे सलग सहावेळा 1985 ते 2009 या कालावधीत जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहे तर, दोन वेळा विधानपरिषदेतून आमदार झाले आहेत.  शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा, कुशल संघटक आणि प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वल्लभ बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासून म्हणून ओळखले जाते.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये; असा असणार दौरा

वल्लभ बेनके यांचा जन्म 23 जून 1950 रोजी हिवरे बुद्रुक या छोट्याशा गावी झाला. बेनके कुटुंबाचा शेती हात प्रमुख व्यवसाय होता. वल्लभ हे 1985 मध्ये जुन्नर विधानसभेतून पहिल्यांदा निवडून आले. यानंतर त्यानंतर 1990 मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले. वर्ष 2004 व 2009 मध्ये पुन्हा वल्लभ जुन्नर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले.

- Advertisement -

हेही वाचा – पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस

कर्तृत्ववान नेतृत्व हरपले; अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वल्लभ बेनके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारे, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -