घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरUddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये; असा असणार दौरा

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये; असा असणार दौरा

Subscribe

छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

छत्रपती संभाजीनगर : कोकण दौऱ्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे एका दिवसात चार सभा घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे लोकसभेच्या उदेवाराची घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

उद्धव ठाकरे हे आज सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल होणार आहेत. यानंतर दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे हे गंगापूर येथील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर वैजापूरमध्ये दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे. तसेच सायंकाळी 5 वाजता कन्नडमधील जनतेशी संवाद साधणार आहे. आणि सायंकाळी 7.30 वाजता उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील एकत्रित सभा होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस

संभाजीनगर बालेकिल्ला

छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण शिवसेनेते फूट पडल्यानंतर लोकसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते आणि पदाधिकारी कसा प्रतिसाद देतील, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यामुळे उद्धव ठाकरेंचा आजचा दौरा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. लोकसभा निवडणुकीसाठी माजी खासदार चद्रकांत खैरे यांच्या नावची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कारण यापूर्वी चंद्रकांत खैरे चार वेळा येथून खासदार राहिले आहेत. यामुळे चद्रकांत खैरेंना पुन्हा एकदा लोकसभा उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वड्याचे तेल ‘वागळें’वर !

असा आहे दौरा

  • उद्धव ठाकरे आज सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार
  • उद्धव ठाकरे हे दुपारी 12 वाजता गंगापूर येथे जनतेशी संवाद साधणार आहेत
  • वैजापूर विधानसभा मतदारसंघात दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे जनतेशी संवाध साधणार
  • उद्धव ठाकरे हे सायंकाळी 5 वाजता कन्नड येथील जनतेशी संवाद साधणार
  • उद्धव ठाकरे यांची सायंकाळी 7.30 वाजता छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील एकत्रित सभा होणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -