घरमहाराष्ट्रवंदे भारत ट्रेन भाविकांसाठी मैलाचा दगड ठरेल : देवेंद्र फडणवीस

वंदे भारत ट्रेन भाविकांसाठी मैलाचा दगड ठरेल : देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुंबईतून शिर्डी येथे ही ट्रेन साईबाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी जाईल. मुंबईत सोलापूर येथे आई तुळजाभवानी, पांडूरंग, स्वामी समर्थ यांचे दर्शन घेण्यासाठी ही ट्रेन धावेल. वंदे भारत ट्रेन ही एक प्रकारे महाराष्ट्रातील भाविकांसाठी मैलाचा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईः वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातील भाविकांसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वंदे भारत ट्रेनची कोणीही कल्पना करु शकत नव्हता. ही ट्रेन म्हणजे अजूबाच आहे. ही ट्रेन प्रवाशांना समाधान देणारी आहे. तिची मांडणी सुंदर केली आहे. मुंबईतून शिर्डी येथे ही ट्रेन साईबाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी जाईल. मुंबईतून सोलापूर येथे आई तुळजाभवानी, पांडूरंग, स्वामी समर्थ यांचे दर्शन घेण्यासाठी ही ट्रेन धावेल. वंदे भारत ट्रेन ही एक प्रकारे महाराष्ट्रातील भाविकांसाठी मैलाचा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी १३ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यातून महाराष्ट्रातील १२४ स्थानकांचा विकास होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा जपला जाणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे आभारच मानायला हवेत. तसेच मुंबईत पहिली रेल्वे सुरु करणाऱ्या नाना शंकर शेठ यांचेही आभार मानायला हवेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर  या दोन वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला.या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. याआधी मुंबई अहमदाबाद वंदे भारत ट्रेन धावली. पीएम मोदींकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आता मुंबईतून एकूण तीन वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास प्रकल्प हे दोन रस्ते प्रकल्प पंतप्रधान मोदी राष्ट्राला समर्पित करतील. यानंतर मोदी मुंबईतील अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनही करतील. या कार्यक्रमांसाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर होते. यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -