घरताज्या घडामोडीVarsha Gaikwad : पहिली आणि दुसरीच्या शालेय अभ्यासक्रमात बदल होणार, वर्षा गायकवाड...

Varsha Gaikwad : पहिली आणि दुसरीच्या शालेय अभ्यासक्रमात बदल होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

Subscribe

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल होत असल्याचे जाहीर केले आहे. वर्षा गायकवाड आज नाशिक दौऱ्यावर असून,याबाबतची माहीती त्यांनी दिली आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर झेडपीच्या शाळांमधून शिक्षण देणार आहेत. याशिवाय या प्राथमिक शिक्षणा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थोर पुरुषांच्या इतिहासातीस कारकीर्दीची ओळख करुन दिली जाणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल होत असल्याचे जाहीर केले आहे. वर्षा गायकवाड आज नाशिक दौऱ्यावर असून,याबाबतची माहीती त्यांनी दिली आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर झेडपीच्या शाळांमधून शिक्षण देणार आहेत. याशिवाय या प्राथमिक शिक्षणा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थोर पुरुषांच्या इतिहासातीस कारकीर्दीची ओळख करुन दिली जाणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे पहिली-दुसरीच्या अभ्यासक्रमातील बदल हा नेमका कसा असेल, याकडे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचेही लक्ष लागले आहे.

याशिवाय वर्षा गायकवाड यांनी थोर पुरुषांच्या नावावरुन सुरु असणाऱ्या वादावरही भाष्य केले आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरुन वाद निर्माण केला जातो,त्यामुळे या महापुरुषांच्या इतिहासाची ओळख करुन दिली जाणार आहे. तसेच, शाळांमध्ये प्रत्येक शनिवार हा पुस्तक विरहित असावा. जेणेकरुन, शालेय मुलांना छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल. याशिवाय शाळांमध्ये ग्रंथोत्सव आणि शिक्षण उत्सव सुरु करणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार

वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ज्या ठिकाणी रूग्णांची संख्या जास्त असेल त्या ठिकाणी पूर्णपणे कोरोना प्रोटोकॉलचं पालन करूनच शाळा सुरू केल्या जातील. यासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. २४ तारखेपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला असून पहिले ते बारावी आणि शिशुवर्गही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

 


हे ही वाचा – ममतांना नकार मात्र ठाकरेंचा चित्ररथ राजपथावर दिसणार, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -