घरमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी, प्रकृती स्थिर असल्याचे मेडिकल बुलेटीन जाहीर

प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी, प्रकृती स्थिर असल्याचे मेडिकल बुलेटीन जाहीर

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी यासंदर्भात मेडिकल बुलेटिन जाहीर करत माहिती दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे सध्या आयसीयूमध्ये असून अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येणार आहे. असेही ठाकूर यांनी सांगितले आहे.

व्यक्तिगत कारणांमुळे पुढील तीन महिने पक्षाच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर राहणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली होती. यामुळे आगामी पाच जिल्ह्यातील निवडणुका लक्षात घेता पक्षाचे आंदोलन आणि निवडणुक कार्यक्रम सुरळीत सुरु राहावा यासाठी रेखा ठाकूर यांच्याकडे वंचितच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

 


प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्तिगत कारणांसाठी पक्षाच्या कार्यक्रमांपासून पुढील तीन महिने दूर राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तीन महिन्यांच्या कार्यकाळात पक्षाचे कार्यक्रम सुरू राहावेत यासाठी रेखा ठाकूर यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण तीन महिने राजकारणापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली. मात्र आंबेडकरांच्या अचानक सुट्टीवर जाण्याच्या निर्णयावरून राजकीय तर्क लढवले जात होते. मात्र आज अधिकृत माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी आज प्रकाश आंबेडकरांचे मेडिकल बुलेटिन जाहीर त्यांच्या बायपास सर्जरीची माहिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरांनी कळवलं आहे. अजून काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल, त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असं रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.

राजकारणपासून तीन महिने दूर राहण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केला होता., “मी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात तीन महिन्यांसाठी कार्यरत राहणार नाही. माझ्या व्यक्तीगत कारणामुळे कार्यरत राहणार नाही. पण पक्ष, संघटन चाललं पाहिजे. आंदोलन सुरु केलीयत. पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक आहे. म्हणून पक्षाला अध्यक्ष असणं आवश्यक आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश पक्षाच्या अध्यक्षपदी प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची निवड करत आहे तर अरुण सावंत आणि जिल्हा कमिटी त्यांना सहकार्य करतील” असे प्रकाश आंबडेकर म्हणाले.


प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या रजेवर, रेखा ठाकूर यांच्याकडे वंचितचे प्रभारी अध्यक्ष पद

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -