घरताज्या घडामोडीमोदी सरकारच्या माजी मंत्र्यांचे पुनर्वसन ? कोणाला मिळणार कोणते पद ?

मोदी सरकारच्या माजी मंत्र्यांचे पुनर्वसन ? कोणाला मिळणार कोणते पद ?

Subscribe

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये १२ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळाला. पण या विस्तारानंतर आता काही माजी मंत्र्यांचे पुर्नवसन करण्याच्या तयारीत भारतीय जनता पार्टी असल्याचे कळते. त्यानुसार संस्थांत्मक जबाबदारी देण्यासोबतच राजकीय पुर्नवसनाच्या तयारीचेही पक्षाने संकेत दिले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर काही जणांना खासदार म्हणून काम करता येणार आहे. काही खासदारांना त्यांच्या राज्यातील जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कळते. तर काही मंत्र्यांना संसदेतील कामकाजामध्ये कायम ठेवण्यात येणार आहे.

माजी मंत्र्यांचे पुर्नवसन करण्याच्या अनुषंगाने काही जणांना राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कळते. काही राज्यांमध्ये राज्यपाल पदाचा संपुष्टात येणारा कालावधी पाहता माजी मंत्र्यांचे पुर्नवसन याठिकाणी होऊ शकते अशी माहिती आहे. त्यामध्ये दिल्ली आणि पंजाब यासारख्या राज्यात येत्या काही दिवसांमध्ये राज्यपालांचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यामुळे याठिकाणी राज्यपाल नेमणुक होऊ शकते असा अंदाज भाजपमधील सूत्रांनी वर्तवला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये येत्या काही महिन्यात राज्यपालांचा कार्यकाळा संपणार आहे. तर येत्या २०२२ मध्ये आसाम, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये राज्यपालांचा कालावधी संपुष्टात येत आहे. याठिकाणी माजी मंत्र्यांपैकी जेष्ठ नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

थावर चंद गेहलोत या ७३ वर्षीय जेष्ठ केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती नुकतीच कर्नाटकच्या राज्यपाल पदावर करण्यात आली. त्यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण हे मंत्रालय होते. तर येत्या काळात दोन जेष्ठ माजी मंत्र्यांचे पुर्नवसन केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये प्रकाश जावडेकर आणि संतोष गंगवर या दोन माजी मंत्र्यांचीही वर्दी राज्यपालपदी होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी चेहरा असलेले गंगवर हे पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. येत्या विधानसभा निवडणूकांमध्ये पक्षाच्या ब्ल्यू प्रिंटसाठी यांच्या अनुभवाची मदत होऊ शकते म्हणूनच त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याचे कळते. जावडेकर यांनाही येऊ घातलेल्या २०२२ च्या राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर जावडेकर यांची नियुक्ती ही पक्षाच्या केंद्रीय पातळीवरही होऊ शकते. केंद्रात त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारीही दिली जाऊ शकते. तर माजी मंत्र्यांपैकीच एक असलेले रविशंकर प्रसाद यांचेही केंद्रात पुर्नवसन केले जाणार आहे. केंद्रीय पातळीवर असलेल्या रिक्त जागांमध्ये एक व्यक्ती एक पद या निकषानुसार नियुक्ती दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सचिव पदावर असलेले भुपेंदर यादव यांची महत्वाची जागा आता रिक्त झाली आहे. त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात जागा मिळाली आहे. सध्या भाजपचे आठ राष्ट्रीय सचिव आहेत. पक्षाच्या संविधानानुसार ९ जणांना नियुक्ती देणे शक्य आहे. तर काही माजी मंत्र्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणतीही जबाबदारी स्विकारण्यासाठी नकार दर्शवला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री राहिलेल्या डॉ हर्षवर्धन यांना मात्र कोणत्या ठिकाणी जबाबदारी देण्यात येणार याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे कळते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -