घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच; टोळक्यांनी फोडली २० वाहने

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच; टोळक्यांनी फोडली २० वाहने

Subscribe

पिंपरी-चिंचवड शहरात तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील आकुर्डी परिसरात २० वाहनांची तोडफोड दहा जणांच्या टोळक्याने केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील आकुर्डी परिसरात २० वाहनांची तोडफोड दहा जणांच्या टोळक्याने केली आहे. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे, लाकडी दांडके आणि विटा होत्या. ही घटना मध्यरात्री घडली असून एकाला कोयत्याचा धाक दाखवून काही रक्कम घेऊन टोळक्यांनी पोबारा केला. या घटनेप्रकरणी अधिक तपास निगडी पोलीस करत असून रुपेश श्रीराम काळभोर यांनी फिर्याद दिली आहे.

pimpri
गाड्यांची तोडफोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दीडच्या सुमारास आरोपी अमन शंकर पुजारी आणि त्याच्या दहा साथीदारांनी आकुर्डीच्या विठ्ठलवाडी परिसरातील जाधव पार्क समोरील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या २० गाड्या कोयते, लाकडी दांडके, विटांच्या साहाय्याने तोडफोड केली. या घटनेत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनतेच्या गाड्याच्या काचा फोडल्याचे नुकसान झाले आहे. दरम्यान, फिर्यादी रुपेश यांची नवीकोरी गाडी फोडली आहे. फिर्यादी रुपेश यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून काही रक्कम लुटली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे आणि कर्मचारी यांनी भेट दिली असून काही तासाच्या आत आरोपींचा मुसक्या आवळू, असे आश्वासन दिले आहे. आरोपीच्या शोधत पथक रवाना झाली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईतील बहुतांश दहीहंड्या रद्द; ‘गोविंदां’मध्ये नाराजी

बायका बांगड्या भरतील या धास्तीने राम कदम यांची दहीहंडी रद्द; मनसेची पोस्टरबाजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -