घरताज्या घडामोडीतौत्के चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी २५० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव - विजय वडेट्टीवार

तौत्के चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी २५० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव – विजय वडेट्टीवार

Subscribe

फडणवीसांनीही केंद्राकडे कोकणासाठी मदत मागावी

तौत्के चक्रीवादळामुळे कोकणावासीयांचे मोठे नुकसान झाले आहे. तौत्केचा फटका कोकणातील समुद्र किनारपट्टीच्या भागाला तडाखा बसला आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, घरांची पडझड झाली, झाडे उन्मळून पडली यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या तौत्के चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळामध्ये केलेल्या नुकसानीसारखी मदत करणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती दिली आहे. केंद्र सरकारला पत्र लिहून नुकसानग्रस्तांसाठी मदतीची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही केंद्राकडे मागणी करावी असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. कोकणातील फळबागांचे नुकसान, नारळांचे नुकसान, शेतमालाचे, घरांची पडझड, बंदराचे नुकसान झाला आहे. याचा आता सविस्तर अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालानुसार जर एनडीआरएफच्या निषामध्ये एकुण ७२ कोटीचा दर एकुण नुकसानीचा दिसतो आहे. परंतु आम्ही असे ठरवले आहे की, निसर्ग चक्रीवादळाला जो जीआर काढला आहे तोच जिआर तौत्के चक्रीवादळाला लागू करण्यात यावा. त्यानुसार साधारणता २५० कोटी रुपये जसे निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना मदत केली होती तसेच एनडीआरएफच्या निकषापेक्षा १८० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीतून देऊन कोकणवासीयांना दिलासा द्यायचा असा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी बैठक घेण्यात आली गुरुवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारला विनंती करणारे पत्र पाठवले आहे की, २०१५ च्या जीआरनुसार पडझड, पुर्णतः घर पडले एनडीआरएफ निकष ९५ हजार रुपयांची मदत आहे. गेल्या ६ वर्षांपासून हे वाढवायला पाहिजे होते परंतु आम्ही आता तो १.५० लाख केला आहे. अंशतः घराचे नुकसान भरपाई ५ हजार आहे परंतु त्याचे टप्पे पाडण्यात आले आहेत ते ५ हजार, १५ हजार २५ हजार ते ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे. फळबागांसाठी पुर्वी १८ हजार प्रतिहेक्टर होते आता ५० हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहे. निकषाच्या बाहेर जाऊन तीनपट अधिक रक्कम देऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम ठरवले आहे.

मागच्या ५ वर्षात ३ वेळा हे चक्रीवादळ आले आहे. अशा स्थितीमध्ये काही गोष्टी कायमस्वरुपी करण्यावर भर देणार आहे. यामध्ये भूमिगत वीज वाहक तारा, नागरिकांना आपत्तीमध्ये स्थलांतर करण्यासाठी शेल्टरची सोय करणे अशा गोष्टी करण्यात येणार आहेत. समुद्राचे पाणी गावांमध्ये आले आहे जे काही बंदारे होते ते फुटले आहेत. त्या बंदाऱ्यांची बांधणी करण्यात येणार आहे. निसर्ग चक्रीवादळापेक्षा तौत्के चक्रीवादळाची तीव्रता कमी होती. निसर्ग चक्रीवादळामध्ये १८ हजार विद्युत खांब पडले होते परंतु आता फक्त ४ हजार पडले आहेत. मागली वर्षी कोकणाला मोठे नुकसान झाले होते तौत्केची तीव्रता कमी असल्याने कमी नुकसान झाले असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

फडणवीसांनीही केंद्राकडे कोकणासाठी मदत मागावी

केंद्र सरकारने गुजरातला मदत केली आहे. राज्य सरकारनेही पत्राद्वारे केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. केंद्र सरकार कोकणी माणसांना मदत करेल अशी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनीही कोकणचा दौरा केला आहे त्यांनी कोकणातील परिस्थिती पाहिली आहे. फडणीसांनी केंद्राकडे मदतीची मागणी करावी अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना काही मदत दिली नाही असे बोलायला कमी वेळ लागतो परंतु आम्ही मदत केली आहे हे सांगायला जास्त वेळ लागतो.

निसर्ग चक्रीवादळामध्ये सगळ्यांना मदत पुरवण्यात आली आहे. २०२ कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती यातील सर्व मदत करुन जिल्हाधिकाऱ्यांनी ५० कोटी रुपये परत पाठवले त्यावेळी राज्य सरकारने सांगितले की, काही मदत शिल्लक असेल तर ती द्या परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सगळ्यांना मदत केली. कोकणातील जनता समाधानी आहेत. आम्हाला कोकणातील जनता असमाधानी वाटली नाही असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -